शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडकरांनी केली लाखांत करभरपाई

By admin | Updated: March 2, 2016 00:55 IST

पालिकेत गर्दी : मंगळवारी दिवसभरात सुमारे बारा लाख रुपये वसुली

कऱ्हाड : मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी थकबाकीधारकांची नावे फ्लेक्सबोर्डवर झळकविण्याचा निर्णय घेत थकबाकीधारकांच्या नावाचे बोर्डही लावले. त्यामुळे शहरातील थकबाकीधारकांकडून कराची रक्कम भरण्यास पालिकेत गर्दी केली जाऊ लागली आहे. सोमवारी दिवसभर ६५ लाखांची वसुली झाल्यानंतर मंगळवारी मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी शहरातील बाजारपेठ बंद असूनही सुमारे दहा लाख रुपये पालिकेच्या करवसुली विभागात जमा झाले.कऱ्हाड पालिकेच्या वतीने युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलेल्या थकबाकीधारकांच्यावरील कारवाईनंतर याची थकबाकीधारकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. त्यामुळे आजपर्यंत वर्षभरात जमा न झालेली कराची थकबाकीची रक्कम ही एका दिवसांत जमा झाली. गेल्या वर्षी ३१ मार्च या शेवटच्या दिवशी ५४ लाख रुपये कराची रक्कम जमा झाली होती. तर यावर्षी २९ फेब्रुवारी या दिवशी ६५ लाख रुपये जमा झाले. शहरातील घरपट्टी व पाणी पट्टीसह एकूण संकलित कर भरणाऱ्यांकडून चालू वर्षासह मागील वर्षाचीही थकबाकीची रक्कम वसूल केली जात आहे. मार्च महिना सुरू झाल्याने पहिल्या दिवशीही थकबाकीधारकांनी पालिकेत येऊन आपली थकित कराची रक्कम भरली. (प्रतिनिधी)दरम्यान, आज मुंबई येथे नगरपरिषद प्रशासन संचालनालयात संचालिका मिता लोचन यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. त्याला कऱ्हाडचे मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते. या बैठकीत कऱ्हाड नगरपरिषदेच्या करवसुलीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. ९० टक्के थकबाकी वसुली झाल्याखेरीज वसुलीच्या प्रमाणात मिळणारे अनुदान कऱ्हाड पालिकेला मिळणार नसल्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.मंगळवार पेठेतील फलक तयारशहरातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या पेठांपैकी मंगळवार पेठेचे नाव घेतले जाते. सध्या मंगळवार पेठेतील थकबाकीधारकांच्या यादीचे फलक तयार करण्यात आले आहे. आठ फूट रुंद व सहा फूट लांबी असलेल्या एका फ्लेक्सवर ९० ते १०० थकबाकीधारकांची नावे टाकण्यात आली आहेत. सर्व पेठांचे फलक तयार झाल्यानंतर ते एकत्रित स्वरूपात लावले जाणार आहेत.सील केलेल्या गाळेधारकांनी भरले चार लाख रुपये पालिकेकडून कऱ्हाड शहरातील थकित गाळेभाडेधारकांवरही कारवाई केली जात आहे. अशात काही दिवसांपूर्वी पालिकेने शहरातील काही गाळे सील केले होते. त्या सीलकेलेल्या गाळेधारकांकडून पालिकेत मंगळवारी सुमारे चार लाख रुपये कराची रक्कम रोख तसेच चेकद्वारे जमा करण्यात आली.