शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

एकात्मता दौडमध्ये कऱ्हाडकर धावले

By admin | Updated: December 15, 2015 23:25 IST

विजय दिवस : शंभरजणांचे रक्तदान; आज मुख्य सोहळा; मान्यवरांची उपस्थिती

कऱ्हाड : भारतीय सैन्यदलाच्या बांगला मुक्ती संग्रामातील देदीप्यमान विजयाप्रीत्यर्थ कऱ्हाडला साजरा होत आहे. या विजय दिवस समारोहाच्या दुसऱ्या दिवशी दि. १५ रोजी विजय दिवस समारोह समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कऱ्हाडदौडमध्ये मंगळवारी कऱ्हाडकर धावले. तर शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी यावेळी रक्तदान केले. यावेळी सलीम मुजावर यांच्या हस्ते झेंडा दाखवून दत्तचौक येथून कऱ्हाड दौडला सुरुवात झाली. यावेळी पोलीस बॅन्डने मानवंदना दिली. कर्नल संभाजीराव पाटील, शंकराप्पा संसुद्दी, अ‍ॅड. संभाजीराव मोहिते, टी. डी. कुंभार, महालिंग मुंढेकर, विनायक विभूते, प्रा. शंकरराव डांगे, रत्नाकर शानबाग आदी मान्यवर उपस्थित होते.दत्तचौक येथून सुरू झालेली कऱ्हाड दौड ही कृष्णानाका, कन्या महाविद्यालय, आझाद चौक, चावडीचौक ते दत्तचौक या मार्गे काढण्यात आली. यावेळी संगमहेल्थ क्लबच्या खेळाडूंसह विविध शाळांचे विद्यार्थी, मिलीटरी बॉईज होस्टेलचे विद्यार्थी यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.यानंतर लिबर्टी मजदूर मंडळ येथील हॉलमध्ये रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी मुख्याधिकारी प्रशांत रोडे, नगरसेविका अरुणा जाधव, मलकापूर उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कर्नल संभाजीराव पाटील, शंकराप्पा संसुद्दी, अ‍ॅड. संभाजीराव मोहिते, टी. डी. कुंभार, रत्नाकर शानबाग, विनायक विभूते आदींनी उपस्थिती लावली. शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. (प्रतिनिधी)