शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भक्तिसंगीताच्या आस्वादाने कऱ्हाडकर मंत्रमुग्ध

By admin | Updated: January 29, 2015 00:14 IST

अभंगाची उधळण : कऱ्हाडला प्रीतिसंगम महोत्सवाची उत्साहात सांगता

कऱ्हाड : येथील वेणूताई चव्हाण सभागृहात रौप्यमहोत्सवी संगीत महोत्सवाची दिमाखदारपणे मंगळवारी सांगता झाली ़ दिवंगत पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी व नातू विराज जोशी यांनी आपल्या सात्विक सुरांनी उपस्थित रसिक मनावर स्थान मिळवत कडाक्याच्या थंडीतही रसिकांना आपल्या अभंगातून भक्तिसंगीताची ऊब निर्माण करून दिली. या भक्तिसंगीताच्या आस्वादाने कऱ्हाडकर मंत्रमुग्ध झाले.कऱ्हाड जिमखान्याने प्रीतिसंगम संगीत महोत्सवाचे आयोजन केले होते. त्याची दिमाखदार सांगता मंगळवारी पंडित श्रीनिवास जोशी व नातू चिरंजीव विराज जोशी यांच्या अभंगवाणीने झाली.यावेळी जिमखान्याचे अध्यक्ष सुधीर एकांडे, सचिव डॉ़ मिलिंद पेंढारकर, चंद्रशेखर देशपांडे, अनिल शहा, विवेक ढापरे, चंद्रकांत जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती़ पंडित श्रीनिवास जोशी यांनी ‘बिहाग’ रागाच्या तारा छेडत अभंगाला प्रारंभ केला़ ‘कैसे सुख सोरे नींद हा बडा ख्याल’ तसेच ‘लट उलझी, सुलझा बालम,’ ‘हाथो मे मेहंदी, खेलो नंदलाल संग आज होली ’ या गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले़ त्यांनंतर पंडितजींनी आपला प्रसिध्द अभंग ‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली’ सादर करून रसिकांची दाद मिळविली. यानंतर दिवंगत पंडितजींचा नातू चिरंजीव विराज जोशी यांनी आपल्या गोड व सुरेल आवाजात नामाचा गजर गर्जे भीमातीर, रामाचे भजन हेची माझे ज्ञान, माझा भाव तुझे चरणी, विमुख शिखर या संत रचनांबरोबर पंडितजींचे गाजलेले भजन ‘बाजे मुरलिया बाजे’ सादर करून मांगल्याच्या मंचावर भक्तिरसाची उधळण केली. श्रीनिवास जोशी यांच्या पु. ल. यांनी संगीतसाज चढवलेल्या ‘माझे माहेर पंढरी’ या अभंगाने भक्तिरसाने चिंब होणे म्हणजे काय या प्रश्नाचे जणू उत्तरच दिले. ‘आजा सावरीयाँ तोसे गरवा लगाओ’ या भैरवी रागातील ठुकरीने कार्यक्रमाची सांगता झाली.मैफलीस तबलासाथ अविनाश पाटील तर संवादिनीची साथ पंडित रवींद्र कातोटी यांनी केली. सांगलीच्या नारायण जोशींच्या पखवाज साथीने कार्यक्रमात रंगत आणली. स्थानिक कलाकार दिलीप आगाशे यांनी टाळावर तर निखिल कुलकर्णी व मधुरा किरपेकर यांनी तानपुऱ्यावर साथ केली. महोत्सवात उपस्थित कलाकारांची ओळख विवेक ढापरे यांनी करून दिली. शिरीष संभूस यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)