शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

कऱ्हाडात पावलोपावली ‘जोर का झटका’

By admin | Updated: March 4, 2015 23:39 IST

सावधान... इथं घोटाळतोय मृत्यू : उघड्या फ्यूजबॉक्स, ट्रान्सफॉर्मरमधून वीजप्रवाह सुरूच, रहदारीच्या ठिकाणी धोका---आॅन दि स्पॉट रिपोर्ट

संतोष गुरव - कऱ्हाड  - अपघात कधी सांगून होत नाही; पण अपघात घडेल, अशी स्थिती असेल तर प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं. कऱ्हाडातही सध्या रस्त्यावरून चालताना नागरिकांना जपूनच चालावं लागतंय. वीज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शहरात पावलोपावली मृत्यू घोटाळतोय. उघडे फ्यूजबॉक्स, गंजलेल्या पेट्या आणि लोंबकळणाऱ्या वायरमुळे ‘जोर का झटका’ कधी बसेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे नागरिक जीव मुठीत घेऊनच रस्त्यावरून वावरतायत. शहरात वीज वितरणासाठी मुख्य चौकासह अंतर्गत पेठांमध्ये फ्यूजबॉक्स तसेच ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत. उपजिल्हा रुग्णालय, कृष्णा नाका, जनता बँकेसमोरील चौक, मंगळवार पेठ, कन्याशाळा, नवीन भाजी मंडई परिसर, शुक्रवार पेठ, सोमवार पेठ, कृष्णामाई घाट परिसर, शुक्रवार पेठ अशा पेठांसह विविध ठिकाणी शेकडो फ्यूजबॉक्स व ट्रान्सफॉर्मर आहेत. मात्र, यातील बहुतांश ट्रान्सफॉर्मर व फ्यूजबॉक्स उघड्यावर आहेत. दरवाजे नसल्याने त्यातील वायर बाहेर लोंबकळत आहेत. संबंधित वायरमधून विद्युत प्रवाह सुरू असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात काही ठिकाणी वीजवितरण कंपनीने भूअंतर्गत वीजवाहक तारांच्या जोडण्या केल्या आहेत. तसेच फ्यूजपेट्या रस्त्यापासून तीन ते चार फुटांवर आहेत.उपजिल्हा रुग्णालयासमोर असलेल्या चौकात वीजवितरणचा ट्रान्सफॉर्मर आहे. फूटपाथलगतच असणाऱ्या या ट्रान्सफॉर्मरशेजारून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत धरून जावे लागते. तसेच कृष्णा नाका येथील चौकात असाच एक ट्रान्सफॉर्मर व फ्यूजबॉक्स आहे. वीज कंपनीकडून फूटपाथवरच काढण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरमुळे नागरिक चोवीस तास मृत्यूच्या दाढेत आहेत. या दोन्ही ट्रान्सफॉर्मरची परिसरातील नागरिकांमध्ये भीती आहे. रस्त्यावर उघड्या अवस्थेत असलेल्या फ्यूजपेट्यांमुळे लहान मुलांसह वयोवृद्ध लोकांचाही जीव धोक्यात असून, कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते. जनता बँक, मंगळवार पेठेतील शिवाजी मंडळाच्या क्रीडांगणासमोरील फ्यूजबॉक्सवरील पेटीच्या काचा फुटल्या आहेत. त्यामध्ये पावसाचे पाणी जात आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी शॉर्टसर्किट होऊन दुर्घटना घडू शकते. वीज कंपनीने फ्यूजबॉक्स व ट्रान्सफॉर्मरवर ‘सावधान’ अशी सूचना लिहिली असली तरी अशा परिस्थितीमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊनच जावे लागत आहे. फ्यूजबॉक्स व ट्रान्सफॉर्मरस्टेट बँकसमोरील पादचारी मार्गावर असलेला फ्यूजबॉक्सजनता बँकेसमोर वळणावर असलेला फ्यूजबॉक्स व ट्रान्सफॉर्मरउपजिल्हा रुग्णालयासमोरील चौकात असलेला ट्रान्सफॉर्मरकृष्णा नाका चौकातील सिग्नलनजीक फ्यूजबॉक्स व ट्रान्सफॉर्मरमंगळवार पेठ येथील फ्यूजपेटीची काच फुटली आहे.लाहोटी कन्या प्रशालेशेजारील डीपीवर एका संघटनेने लावलेला फलकनवीन भाजी मंडई परिसरातील ट्रान्सफॉर्मरला कचऱ्याचा वेढा वीज कंपनीमधील कर्मचारी फ्यूजपेट्याच्या दुरुस्तीसाठी साधे फिरकत सुध्दा नाहीत. उघड्यावर असलेल्या ट्रान्सफॉर्मर व त्यावरील फ्यूजपेटीची अवस्था पाहिल्यास त्याच्या जवळ जाणेही धोक्याचे वाटते. परिसरातील लहान मुले त्याठिकाणी जाऊ नयेत, यासाठी आम्हाला लक्ष द्यावे लागते.- हेमंत जाधव, नागरिक, शुक्रवार पेठविद्यार्थ्यांनाही धास्तीस्थानक ते महिला महाविद्यालय मार्गावरील पादचारी रस्त्यावर तीन ठिकाणी ट्रान्सफॉर्मर व डीपी बसवण्यात आले आहेत. पहिला ट्रान्सफॉर्मर स्टेट बँक आॅफ इंडियासमोरील पादचारी मार्ग, दुसरा जनता बँकेसमोर, तिसरा कृष्णा नाका सिग्नल चौकात आहे. या ट्रान्सफॉर्मरच्या जवळून जाताना पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.गंजक्या फ्यूजपेटीत तारा नव्या कोऱ्याकऱ्हाड शहरातील रस्त्याकडेला असणाऱ्या फ्यूजपेट्यांची अवस्था खूप गंभीर बनली आहे. काही ठिकाणी बसवण्यात आलेल्या फ्यूजपेट्यांना गंज चढला असून, त्यातील तारा मात्र नव्या कोऱ्या आहेत.अकरा ठिकाणी मृत्यूला निमंत्रणशहरातील अकरा ठिकाणी सध्या अत्यंत धोकादायक ट्रान्सफॉर्मर व फ्यूजबॉक्स आहेत. काहीच्या संरक्षक काचा फुलेल्या आहेत तर काहीची भंगारात घालण्यासारखी अवस्था झाली आहे. हे फ्यूजबॉक्स व ट्रान्सफॉर्मर मृत्यूला निमंत्रण देत आहेत.वीज कंपनीकडून फक्त वसुली दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या विजेची बिल वसूल वीज कंपनीकडून न चुकता केली जाते. प्रत्येक महिन्याला न चुकता वीजबिले दिली जातात. मात्र, वाकलेले खांब, गंजलेल्या फ्यूजपेट्यांच्या दुरुस्तीकडे वीज कंपनी दुर्लक्ष करते.