शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडकरांना मिळाल्या सुंदर हस्ताक्षराच्या क्लृप्त्या !

By admin | Updated: December 16, 2014 23:35 IST

‘लोकमत बाल विकास मंच आणि सखी मंच’ कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कऱ्हाड : सुंदर हस्ताक्षर हा दागिना समजला जातो आणि या दागिन्याची बालचमूंसह त्यांच्या पाल्यांना ओळख व्हावी, यासाठी पालिकेच्या शाळा क्रमांक तीनमध्ये ‘हॅन्डरायटिंग इम्प्रूव्हमेंट कॅम्प’चे आयोजन करण्यात आले होते. ‘लोकमत बाल विकास मंच आणि सखी मंच’ कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी कॅम्पमध्ये सहभागी होत अक्षर वळणदार करण्याचा सराव केला़ रविवारी सकाळी दहा ते बारा या वेळेत झालेल्या या कॅम्पला कऱ्हाड शहरातील पालकांनी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. सकाळपासूनच नागरिक कॅम्पस्थळी दाखल होत होते़ चिमुकल्यांना घेऊन त्यांचे पालकही प्रशिक्षणस्थळी हजर होते़ प्रारंभी कार्यक्रमाचे उद्घाटन संजय पाटील, अर्जुन कोळी, प्राची शहा, शारदा पवार यांच्या हस्ते झाले. सातारा येथील ईशा प्ले स्कूलच्या संचालिका प्राची शहा यांनी हस्ताक्षर वळणदार आणि सुंदर काढण्यासाठीच्या क्लृप्त्या प्रशिक्षणार्थींना दिल्या़ दोन तास चाललेल्या या कॅम्पला लहानांसह मोठ्यांनीही हजेरी लावली़ (प्रतिनिधी)डान्स इंडिया डान्स फेम सिद्धेश पै जानेवारीत साताऱ्यातपंकज चव्हाण डान्स अ‍ॅकॅडमीने दि. २ ते ११ जानेवारी या कालावधीत डान्स वर्कशॉपचे आयोजन केले आहे. यासाठी डान्स इंडिया डान्स फेम नृत्यदिग्दर्शक सिद्धेश पै साताऱ्यात नृत्याचे धडे देणार आहे. ‘लोकमत’ याचे माध्यम प्रायोजक आहे.लोकमतच्या सखी, बाल आणि युवा नेक्स्टच्या सभासदांना या वर्कशॉपच्या प्रशिक्षण फी मध्ये घसघशीत सवलत मिळणार आहे. अधिक माहितीसाठी लोकमत कार्यालय आणि पंकज चव्हाण डान्स अ‍ॅकॅडमी, कमानी हौद येथे संपर्क साधावा.हस्ताक्षर सुधारण्याच्या उपाय हस्ताक्षर सुधारण्यासाठी कोणते बदल करावेत़, अक्षर कसे काढावे, कोणता कागद व पेन वापरावा, तो कसा पकडावा, उभे अक्षर, तिरके अक्षर, चांगल्या पद्धतीने कसे काढावे, हे आयोजकांमार्फत शिकविण्यात आले़ प्रत्येक वयोगटासाठी विविध पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले़ कऱ्हाड येथे ‘लोकमत बाल विकास मंच आणि सखी मंच’ आयोजित ‘हॅन्डरायटिंग इम्प्रूव्हमेंट कॅम्प’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.