शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडला फ्लाईंग ॲकॅडमी सुरु करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:49 IST

कऱ्हाड : कऱ्हाड विमानतळावर ॲम्बिशिअस फ्लाईंग स्कूल प्रायव्हेट लिमिटेड व एअरस्पीड एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने लवकरच फ्लाईंग ॲकॅडमी स्कूल ...

कऱ्हाड : कऱ्हाड विमानतळावर ॲम्बिशिअस फ्लाईंग स्कूल प्रायव्हेट लिमिटेड व एअरस्पीड एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने लवकरच फ्लाईंग ॲकॅडमी स्कूल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कऱ्हाड विमानतळ हे गोवा आणि पुणे विमानतळाला मध्यवर्ती आहे. गोवा आणि पुणे विमानतळावर हवाई दलाची वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने तेथे खासगी विमान वाहतुकीला परवानगी दिली जात नाही. या पार्श्वभूमीवर कऱ्हाड विमानतळावर ॲकॅडमी सुरु करण्याबाबत शुक्रवारी चाचपणी करण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींनी कऱ्हाड विमानतळावर एका विमानासह पाहणी केली. यावेळी परवेज दमानिया, मनोज प्रधान, विनोद मेमन, मिहीर भगवती उपस्थित होते.

कऱ्हाड विमानतळ हे फ्लाईंग ॲकॅडमी सुरू करण्यासाठी योग्य ठिकाण आहे. त्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीशी बोलून आवश्यक त्या परवानग्या घेऊन ही ॲकॅडमी लवकरात लवकर सुरू करण्यात येईल. यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचे महत्त्वाचे सहकार्य मिळत असल्याचे दमानिया यांनी सांगितले.

देशात 10 ठिकाणी तर महाराष्ट्रात 3 ठिकाणी हे स्कूल सुरू आहे. या अकादमीमध्ये स्थानिकांसह देशभरातून विद्यार्थी प्रवेश घेतील. विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन खाजगी विमान कंपन्यांमध्ये त्यांना संधी मिळू शकते. या कोर्सच्या माध्यमातून कराड परिसराच्या आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे. त्याचबरोबर प्रगतीचे नवे दालन खुले होत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे आर्थिक प्रगतीला चालना मिळेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

फोटो ओळ

कराड येथील विमानतळावर फ्लाईंग स्कूल सुरु करण्याबाबत आज चाचपणी झाली. यावेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण व कंपन्यांचे पदाधिकारी