शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडला ‘निर्मल शहर’साठी प्रयत्न गरजेचे!

By admin | Updated: July 27, 2015 00:17 IST

वानवा : अडीच हजार कुटुंबांकडे नाही वैयक्तिक शौचालय

कऱ्हाड : राज्य शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत येथील नगरपालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील दोन हजार पाचशे कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या अभियानांतर्गत निर्मल शहर करण्यासाठी पालिकेला मेहनत घ्यावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाने चार जुलैला राज्यभर शाळाबाह्य बालकांचा सर्व्हे केला. त्यावेळी नगरविकास विभागाने या सर्व्हेबरोबरच स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरातील शौचालयांचाही सर्व्हे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तोही सर्व्हे झाला. त्यानुसार ७४ हजार ३५५ लोकसंख्या असलेल्या कऱ्हाड शहरात सुमारे १६ हजार मिळकती आहेत. त्यातील कुटुंबांची संख्या १५ हजार ४७० आहे. त्यात वैयक्तिक शौचालय असलेल्या कुटुंबांची संख्या १२ हजार ९६३ आहे. या सर्वेक्षणात वैयक्तिक शौचालय नसणाऱ्या कुटुंबांची संख्या दोन हजार ५०७ असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये मार्केट यार्ड परिसरात ४२२, सोमवार पेठ परिसरात १६८, रुक्मिणीनगर, वाखाण रोड - २३५, मंगळवार पेठ ३५१, रविवार व शुक्रवार पेठ १३९, अशी आकडेवारी आहे. अन्य आकडेवारी एकत्रित करण्याचे काम सुरू आहे. वैयक्तिक शौचालय नसणाऱ्या कुटुंबांची संख्या सुमारे अडीच हजारांच्या घरात गेल्याचे पाहायला मिळते. या कुटुंबांकडून सध्या शहरातील सार्वजनिक शौचालयांचा वापर होत आहे.पालिकेने शहरात २३ सार्वजनिक शौचालये उभारली असून, त्यात पुरुषांसाठी १८५ तर महिलांसाठी १९३ असल्याचे सांगण्यात आले. सार्वजनिक शौचालयात बालकांसाठी ५५ सीट्सची सोय केली आहे. दरम्यान, पालिकेने यापूर्वी २०१२-१३ मध्येही सर्वेक्षण केले होते. त्यावेळी दोन हजार ३४ कुटुंबांकडे शौचालये नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावेळी शौचालये नसणाऱ्या कुटुंबांची संख्या कऱ्हाड ग्रामीणमध्ये सर्वाधिक होती. यावेळीही कऱ्हाड ग्रामीणमध्येच संख्या अधिक आहे. (प्रतिनिधी)