शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड आरटीओची पावती पुस्तके नदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 22:51 IST

कऱ्हाड : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून पावती पुस्तके चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी गुरुवारी अटक केली होती.

कऱ्हाड : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून पावती पुस्तके चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी गुरुवारी अटक केली होती. त्यांनी चोरीची दोन पावती पुस्तके गुन्हा दाखल झाल्यानंतर नदीपात्रात फेकून दिल्याचे समोर येत असून, अन्य चार पुस्तके पोलिसांनी हस्तगत केली आहेत.

शैलेंद्र सदानंद नकाते (रा. मंगळवार पेठ, कऱ्हाड), प्रवीण प्रल्हाद साळुंखे ऊर्फ पप्पू परीट (रा. कोडोली, ता. कºहाड) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे असून, त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात चोरलेल्या पुस्तकातील पावत्यांचा गैरवापर करून संशयितांनी वाहनधारकांकडून पैसे लुबाडले. हा प्रकार उघडकीस आल्यावर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील लिपिकाने कºहाड शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी नकाते व साळुंखे या दोघांना अटक केली. त्यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अडगळीत ठेवलेली चार चोरीची पुस्तके काढून पोलिसांना दिली. तर दोन पुस्तके गुन्हा दाखल झाल्यावर कºहाडजवळ नदीत फेकून दिल्याचे समोर येत आहे. या गुन्ह्यात संशयितांची संख्या वाढणार आहे.पंचनामा होतोय ‘इनकॅमेरा’गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सलग दोन दिवस संशयितांना घेऊन पंचनामा केला. पंचनाम्याला कºहाड शहर पोलीस ठाण्यापासून सुरुवात झाली. पंचनामा इनकॅमेरा करण्यात आला असून, संशयितांचे जबाबही इनकॅमेरा घेण्यात आले. वाहनधारकांचे जबाबही इनकॅमेरा घेण्यात येतील, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.