शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

कऱ्हाडचे पोलीस निरीक्षक ‘हॉटसीट’वर!

By admin | Updated: March 26, 2015 00:06 IST

पोलीस ठाण्यात बदलाचे वारे : ‘पाटील’ रजेवर, ‘म्हेत्रे’ हजर; सतरा वर्षांत बारा कारभारी; नूतन निरीक्षकांसमोर गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान

संजय पाटील - कऱ्हाड -येथील शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदाची खुर्ची म्हणजे ‘हॉटसीट’. आजपर्यंत या खुर्चीवर अनेक अधिकारी बसले. त्यातील काहीनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं; पण काहीना या ‘हॉट’ खुर्चीचा चांगलाच ‘चटका’ बसला. कायदा, सुव्यवस्था राबवताना ते स्वत:च वादात सापडले. ‘तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ’ ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांचेही कधी-कधी येथे हात भाजलेत. सध्याही शहर पोलीस ठाण्यात बदलीचे वारे वाहतायत. ‘पाटील’ रजेवर गेल्याने खुर्चीचा कार्यभार ‘म्हेत्रें’कडे सोपविण्यात आलाय. मुळात निरीक्षक म्हेत्रे हे मितभाषी. त्यामुळे या खुर्चीवर बसून शहरातील कायदा, सुव्यवस्था सांभाळताना त्यांना कसरत करावी लागणार, हे नक्की. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदाची जबाबदारी आजपर्यंत अनेक अधिकाऱ्यांनी सांभाळली. प्रत्येकानेच आपापल्या पद्धतीने शहरात कायदा, सुव्यवस्था राबविण्याचा प्रयत्न केला; पण ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय’ अशीच शहराची अवस्था. त्यामुळे कोणती परिस्थिती कशी हाताळावी, हेच कधी-कधी अधिकाऱ्यांना समजत नाही आणि समजलंच तरी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय ती परिस्थिती त्यांना तशी हाताळता येत नाही. परिणामी, अधिकाऱ्यांचा अक्षरश: ‘ढोल’ होतो. त्यांना दोन्ही बाजंूकडून बडवलं जातं. या परीक्षेत जे अधिकारी ‘पास’ झाले ते टिकले; पण ज्यांनी ‘नमनालाच घडाभर तेल ओतलं’ त्यांना सर्वांच्याच रोषाला सामोर जावं लागलं. आजपर्यंत वरिष्ठ निरीक्षक म्हणून कार्यकाल पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांना याचा अनुभव आहे, आणि जे नव्याने पदभार स्वीकारतायत त्यांनाही हा अनुभव घ्यावा लागणाराय. मुळात शहरात शांतता प्रस्थापित करायची असेल, तर अधिकाऱ्यांना तशी कामगिरी दाखवावी लागते. काम करणाऱ्या अधिकाऱ्यास कऱ्हाडकर साथ देतात; पण फक्त खुर्ची सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याला नागरिकांची साथ मिळत नाही, असा आजपर्यंतचा इतिहास. त्यामुळे येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना खुर्ची आणि कायदा-सुव्यवस्था या दोन्ही गोष्टी सांभाळाव्या लागणार.दीड महिन्यापूर्वी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील आजारी रजेवर गेलेत. अद्यापही ते हजर झाले नाहीत. त्यामुळे शहर पोलीस ठाण्याला ‘कारभारी’च नसल्याची परिस्थिती होती. अशातच पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार कऱ्हाडच्या वरिष्ठ निरीक्षकपदी संभाजी म्हेत्रे यांची नियुक्ती करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी निरीक्षक म्हेत्रे यांनी येथील पदभार स्वीकारून माहितीही घेतली; पण शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदाची खुर्ची सांभाळताना त्यांना फक्त पोलीस ठाणे सांभाळून चालणार नाही. नागरिकांशी सुसंवाद राखण्यापासून गुन्हेगारी कारवाया थोपविण्यापर्यंतची सर्व कामगिरी त्यांना करावी लागणार आहे.काही दिवसांपूर्वी शहर पोलीस ठाण्याच्या शांतता समितीची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत नागरिकांसह विविध संघटनांनी पोलिसांच्या भूमिकेवर आगपाखड केली. पोलीस सर्वसामान्यांना विश्वासात घेत नाहीत. त्यांच्यात मिसळत नाहीत. सन्मान राखत नाहीत, असे आरोप बैठकीत करण्यात आले. त्यातून पोलीस अधिकाऱ्यांंविषयी असलेला नागरिकांचा संताप स्पष्ट झाला. हा संताप कमी होण्यासाठी निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. तसेच पूर्वीच्या गुन्ह्यांची उकल करण्याचे कामही त्यांना करावे लागणार आहे. त्यामुळे त्यांची खरी कसोटी आहे. कमीत कमी दोन महिने, जास्तीत जास्त तीन वर्षेकऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी ३ नोव्हेंबर १९९७ रोजी ल. बा. माळी यांची नेमणूक झाली. निरीक्षक माळी यांनीच आजपर्यंत आपला तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला आहे. निरीक्षक पी. के. घार्गे हे १२ डिसेंबर २००० रोजी हजर झाले. ६ जून २००३ मध्ये त्यांची बदली झाली. त्याचदिवशी हजर झालेल्या आर. डी. घुगे यांनी २९ जानेवारी २००४ पर्यंत म्हणजेच फक्त सात महिने कार्यभार पाहिला. ३० जानेवारी २००४ मध्ये नेमणूक झालेल्या जे. पी. तिवटे यांनी शहर पोलीस ठाण्यात फक्त दहा महिने काढले. त्यांची बदली झाल्यानंतर एस. एम. रजपूत हजर झाले; पण तेही फक्त दोन महिन्यांसाठी.महादेव गावडे एक वर्ष चार महिने वरिष्ठ निरीक्षक म्हणून येथे कार्यरत राहिले. २० जानेवारी २००५ ते १२ मे २००६ पर्यंतचा त्यांचा काळ कऱ्हाडची गुन्हेगारी मोडीत काढणारा ठरला. आर. एस. कामिरे यांनीही त्यांचे एक वर्ष गाजवले. २३ मे २००७ रोजी त्यांची बदली झाली.आर. व्ही. मोहिते यांनी एक वर्ष व त्यांच्यानंतर आलेल्या संभाजी पाटील यांनी दोन वर्षे दोन महिन्यांचा कार्यकाल पूर्ण केला. संभाजी पाटील यांच्या कार्यकालात काही वादावादीचे प्रसंगही उद्भवले. मुरलीधर मुळूक २६ आॅगस्ट २०१० रोजी रूजू झाले. २ जुलै २०१३ रोजी त्यांची बदली झाली. त्यानंतर संजय सुर्वे यांनी आठ महिने पद सांभाळले. १७ फेब्रुवारी २०१४ रोजी बी. आर. पाटील यांनी पद्भार स्वीकारला.आधी सहायक, आता वरिष्ठ निरीक्षकनिरीक्षक संभाजी म्हेत्रे यांनी यापूर्वी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी ढेबेवाडी, ता. पाटण येथेही सेवा बजावली असून सातारा व पुण्यातही त्यांनी काम केले आहे. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी आर. व्ही. मोहिते व त्यानंतर संभाजी पाटील कार्यरत असताना संभाजी म्हेत्रे येथे कार्यरत होते.