‘स्वच्छ सर्वेक्षण’ व ‘माझी वसुंधरा’त यश
कराड पालिकेच्या गत साडेचार वर्षांतील कामाचा लेखाजोखा मांडायचा म्हटला तर, नागरी स्वच्छ सर्वेक्षण अभियान व माझी वसुंधरा अभियान यामध्ये मिळवलेले यश हेच महत्त्वाचे आहे. पण यात काही मोजके लोकप्रतिनिधी वगळता इतरांचा सहभाग किती? हा सुद्धा संशोधनाचा भाग आहे. तर अधिकाऱ्यांचे परिश्रम आणि लोकसहभाग नजरेआड करता येणारा नाही.
चौकट
महसुली उत्पन्न ५५ ते ६० कोटी
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या कराडची वेगळी ओळख आहे. येथील पालिकेला घरपट्टी, पाणीपट्टी, करवसुली व शॉपिंग सेंटर वगळता उत्पन्नाची इतर साधने नाहीत. त्यामुळे साधारणत: ५५ ते ६० कोटी एवढे महसुली उत्पन्न पालिकेत पाहायला मिळते.
चौकट
यादव- पाटील काय करणार ?
पालिका निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या जनशक्तीच्या नेत्यांनी अवघ्या काही दिवसातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठ फिरवली. प्रत्यक्ष निवडणुकीत पराभूत झालेल्या राजेंद्र यादव यांनी स्वीकृत नगरसेवक होत गटनेतेपद सांभाळले. तर जयवंतराव पाटील यांना उपनगराध्यक्षपद मिळाले. मात्र सत्ता स्थापनेनंतर दोनच वर्षात यादव -पाटील यांच्यात दरी पडली. ती आज अखेर कायम आहे. जनशक्ती आघाडीचे नेते अरुण जाधव यांनी तर पुढील राजकारणात पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर राहण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे यादव आणि पाटील हे दोन्ही नेते या निवडणुकीत नेमके काय करणार? हे पहावे लागणार आहे. या दोघांच्याही स्वतंत्र दोन आघाड्या नोंदणीकृत आहेत. त्या आघाड्या या निवडणुकीत उतरणार का? हे पहावे लागणार आहे.
फोटो
कऱ्हाड नगरपालिका