शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड पालिकेचे दीडशे कोटींचे ‘बिग बजेट’

By admin | Updated: February 27, 2016 00:46 IST

अर्थसंकल्पीय सभा : अंदाजपत्रकात दहा कोटींची वाढ; पाणीपट्टी व अन्य किरकोळ वाढीस मंजुरी

कऱ्हाड : पालिकेत शुक्रवारी झालेल्या सभेत १४८ कोटी २४ लाख ६९ हजार ३०० रुपयांचा अर्थसंकल्प बहुमताने मंजूर करण्यात आला. पलिकेच्या उत्पन्न वाढीसाठी मीटरपद्धतीने आकारणी करून पाणीपट्टी वाढी करणे, नगरपालिकेच्या मालमत्तांची व अग्निशामक दलाची भाडेवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा संगीता देसाई होत्या. यावेळी मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते. कऱ्हाड पालिकेची अर्थसंकल्पीय सभा शुक्रवारी पार पडली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. २०१६-१७ या वर्षात नियोजित महसुली खर्च ५० हजार ४६ लाख ५४ हजार व ३१ मार्च २०१६ अखेरची शिल्लक ८ लाख ६० हजार राहील इतका अंदाज आहे. अर्थसंकल्पात नवीन इलेक्ट्रिक पोल, दिवे यासाठी ३० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. स्ट्रीटलाईट तसेच म्युन्सिपल मिळकतीच्या एनर्जी बिलासाठी ८ लाखांची तरतूद आहे. खांब, डीपी व ट्रान्सफॉर्मर हलविणे, यासाठी २९ लाखांची तरतूद केली आहे. पाणीपुरवठा योजनेंतर्गत वितरणव्यवस्था, कर्मचारी वेतन, कर्जाचे हप्ते व कर्जावरील व्याज, वॉटर वर्क्स व इतर खर्च यासाठी ४ कोटी ६७ लाख ३९ हजार १३१ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरात नवीन गटारे बांधणे, जुन्या गटारांची दुरुस्ती यासाठी सुधारित अंदाजपत्रकात ४६ लाख २३ हजारांची तरतूद करण्यात आली आहे. मंडई इमारतीची देखभाल व दुरुस्तीसाठी ३ लाखांची तरतूद केली आहे. शनिवार पेठेतील भाजी मंडईच्या इमारतीसाठी ७ लाखांची तरतूद केली आहे. सुपर मार्केटमध्ये बांधण्यात आलेल्या इमारतींची दुरुस्ती आणि देखभालीसाठी ५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. गुरुवार पेठेतील मासे आणि मटन मार्केटसाठी १.२४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. स्मशानभूमी तसेच दफनभूमीच्या विस्तार व सुधारणा कामासाठी २० लाखांची तरतूद केली आहे. यामध्ये कंपाउंड, वृक्षारोपण, सोलर सिस्टीम आदी कामांचा समावेश आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती सदनाभोवतीच्या उद्यानामध्ये विविध प्रकारांची शोभिवंत रोपे लावण्यात येणार आहेत. या कामात आणखी सुधारणा करण्यासाठी ५ लाखांची तरतूद केली आहे. याबरोबरच प्रीतिसंगम बागेसाठी १ लाख, नवीन बागांसाठी १० लाख, पी. डी. पाटील उद्यानासाठी १ लाख १० हजार, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनसाठी २ लाख, नगरपालिका इमारतीची दुरुस्ती व विस्तारासाठी १५ लाख, प्राथमिक शाळा इमारत बांधणी व दुरुस्ती १५ लाख, चौक सुधारणा ६ लाख, स्टेडियम सुधारणा १० लाख, सांस्कृतिक कार्यक्रम १ लाख, हुतात्मा स्मारक ८ लाख, विहीर खोदणे, गाळ काढणे, बोअरसाठी ५ लाख, व्यापारी पुनर्वसन ५ लाख, शॉपिंग सेंटर बांधणी व दुरुस्ती ८ लाख, रेकॉर्ड रुम दहा लाख, रेकॉर्ड रूमचे डिजिटलायजेशन ३० लाख, नवीन कमानी ३ लाख, मागासवर्गीय वस्ती सुधारणा १० लाख अशी तरतूद करण्यात आली आहे. भाग १, भाग २, भाग ३, भाग ४ मधील २०१६-२०१७ च्या अनुमानित अंदाजपत्रकानुसार एकूण १४८ कोटी २४ लाख ६९ हजार ३०० रुपयांच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)