शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पदांच्या ‘वर्षा’वामुळे कऱ्हाड ‘कमळ’मय !

By admin | Updated: September 23, 2016 00:46 IST

केंद्रासह राज्याला नेतृत्व देणाऱ्या कऱ्हाडवर भाजपचे लक्ष : कालेचे संग्राम माळी प्रदेश उपाध्यक्षपदी

कऱ्हाड : राजकीय दृष्टिकोनातून महत्त्व असणाऱ्या अन् राज्याला काँगे्रस पक्षाच्या माध्यमातून दोन मुख्यमंत्री दिलेल्या कऱ्हाडवर भाजपने चांगलेच लक्ष केंद्रित केले आहे. देशात अन् राज्यात भाजपची सत्ता येताच राज्यमंत्री दर्जाचे सहकार परिषदेचे अध्यक्षपद, जिल्हाध्यक्षपद, प्रदेश सरचिटणीस, ऊस नियंत्रण परिषद सदस्य आदी महत्त्वाची पदे कऱ्हाडला दिली आहेत. जिल्ह्याला मिळालेला १८ कोटी विकास निधीपैकी ८ कोटींचा ‘वर्षाव’ कऱ्हाडवर झाला आहे. त्याबरोबरच काले येथील संग्राम माळी यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केल्याने कऱ्हाडात भाजपचे कमळ फुलविण्याची जबाबदारी वाढली आहे.गत विधानसभा निवडणुकीवेळी कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघातून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसच्या चिन्हावर रिंगणात उतरले होते. त्यांच्या विरोधात डॉ. अतुल भोसले यांनी भाजपच्या उमेदवारीवर दंड थोपटले. तर विक्रम पावसकर इच्छुक असतानाही पक्षादेश मानत त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा प्रामाणिक प्रचार केला. यात भाजपला दक्षिणेत यश आले नाही; पण केंद्राबरोबर राज्यातही भाजपचे सरकार अस्तित्वात आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांविरोधात लढलेल्या भाजपच्या नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या.राज्य मंत्रिमंडळात चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय असणाऱ्या शेखर चरेगावकरांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली अन् कऱ्हाडला राज्य मंत्रिपदाचा लाल दिवा मिळाला. त्यानंतर संघटनात्मक पातळीवर काही बदल झाले. कऱ्हाडच्या अ‍ॅड. भरत पाटील यांच्या जागी कऱ्हाडच्याच विक्रम पावसकरांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली. भरत पाटील यांची प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य म्हणून तर डॉ. अतुल भोसले यांची प्रदेश चिटणीसपदी निवड झाली. भाजपच्या ताब्यात असलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांची शासनाच्या ऊस दर नियंत्रण समितीवर सदस्य म्हणून निवड झाली. या सगळ्या निवडीमुळे येथील कार्यकर्ते चांगलेच चार्ज झाले.विक्रम पावसकर यांनी जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विकास निधीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्याला गत महिन्यात यश आले. जिल्ह्याला १८ कोटींचा विकास निधी मिळाला. पैकी ८ कोटी कऱ्हाडसाठी आहे हे विशेष.त्याचबरोबरच काही दिवसांपूर्वी मूळचे कालेचे असणारे व व्यवसायानिमित्त पुणे येथे कार्यरत असणारे संग्राम माळी यांची प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली आहे. यावेळी खासदार संजय काकडे, आमदार भीमराव तपकिरे उपस्थित होते. तालुक्याला भाजपने आणखी एका पदाची जबाबदारी दिली, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. संग्राम माळी हे राष्ट्रीय माळी समाज युवक महासंघाचे उपाध्यक्ष आहेत. गेल्या दोन वर्षांत या संघाच्या वतीने राज्यातील ६ लाखांवर युवकांचे संघटन जोडण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. कऱ्हाड तालुक्याबरोबर पुणे येथेही त्यांचे कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची निवड महत्त्वपूर्ण मानली जाते.त्यांच्या या निवडीमुळे भाजपने कऱ्हाडला झुकते माप दिल्याचे मानले जाते; पण त्याबरोबर कऱ्हाड तालुकाच नव्हे तर जिल्हा भाजपमय करण्याची जबाबदारी या साऱ्यांची आहे. ते कशी पार पाडणार यासाठी काही वेळ वाट पाहावी लागेल. (प्रतिनिधी)भाजपतर्फे पी. व्ही. सिंधूचा होणार सत्कारपुणे येथे ३ आॅक्टोबर रोजी आॅलिम्पिक स्पर्धेतील विजेती पी. व्ही. सिंधू यांचा सत्कार सोहळा भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या भव्य सोहळ्याच्या नियोजनाची जबाबदारी संग्राम माळी यांच्यावर देण्यात आली असून, खासदार संजय काकडे, आमदार भीमराव तपकिरे यांच्या सहकार्यातून ते याच्या नियोजनाची तयारी करीत आहे.मी व्यवसायानिमित्त पुण्यात असलो तरी माझी कऱ्हाडची नाळ मी तुटू दिलेली नाही. मला प्रदेश उपाध्यक्षपद देऊन भाजपने माझ्यावर विश्वास दाखविला आहे. पुण्याबरोबरच कऱ्हाड तालुक्यात भाजप बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. विशेषत: माळी समाजातील जास्त लोकांना भाजपमध्ये सामावून घेण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.- संग्राम माळी, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप