शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड पालिकेच्या घनप्रकल्पाचा ‘कचरा’!

By admin | Updated: September 30, 2015 00:04 IST

ढीग जैसे थे : कचरा एकत्रिकरणास दिवसाकाठी १३ हजारांचा खर्च; दररोज सरासरी चाळीस टन कचरा

संतोष गुरव -कऱ्हाड शहरातील वाढीव हद्दीसह अंतर्गत भागातून दररोज सुमारे ४० टन कचरा पालिकेकडून एकत्रित केला जात आहे. गणेशोत्सवात शहरातून अकरा दिवसांत फक्त अठरा टन निर्माल्य गोळा झाले. दिवसाला गोळा होणारा २० टन ओला कचरा आणि २० टन सुका कचरा अशा साधारणत: ४० टन कचऱ्यांवर पालिकेने प्रक्रिया करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. पूर्वीच्या घनकचरा प्रकल्पाचीही अवस्था सध्या बिकट असल्याने आता दररोज शहरातून गोळा केला जाणारा ४० टन कचरा व गणेशोत्सवात गोळा झालेले १८ टन निर्माल्य अशा एकूण ५८ टन कचऱ्याची विल्हेवाट पालिका कशी लावणार, असा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे.घनकचरा एकत्रिकरणासाठी पालिकेला दिवसाकाठी १३ हजार ६९८ रूपये इतका खर्च करावा लागत असल्याने पालिकेने २०१५-१६ वर्षीच्या अर्थसंकल्पात ५० लाख रूपयांची तरतूद केली आहे. शहरातील नागरिक, दुकानदार तसेच भाजीविक्रेते यांच्याकडून दररोज होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेकडून आरोग्य विभागातील स्वच्छता टीमच्या माध्यमातून शहरातील कचरा दररोज एकत्रित केला जातो. एकत्रित केला गेलेला कचरा शहराबाहेरील हद्दवाढ झालेल्या ‘बाराडबरी’ या ठिकाणी साठवला जात आहे. कऱ्हाड पालिकेने दुर्गंधीयुक्त ओला कचऱ्यावर प्रक्रिया करून ४ मेट्रिक टन क्षमतेच्या बायोगॅस / वीजनिर्मिती भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर मुंबई (बीएआरसी) यांच्या प्रकल्प उभारणीस मंजुरी मिळालेली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) या योजनेतून घेतला जाणार असून या प्रकल्पाची किंमत १ कोटी ६ लाख इतकी आहे. कारण या ठिकाणी पालिकेकडून दररोज ४० टन घनकचरा टाकला जात असल्याने येथील नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. त्याचा परिणाम त्या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. शहरातून दररोज ४० टनाच्या आसपास घनकचरा हा ‘बाराडबरी’ या ठिकाणी पालिकेकडून टाकला जात आहे. परिणामी महिन्याकाठी मोठ्या प्रमाणात घनकचरा या ठिकाणी साठवला जात आहे.शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेकडून दरवर्षी ठरावीक रक्कम खर्च केली जाते. यामध्ये दरवर्षी सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात निधीची तरतूदही केली जाते. या २०१५-१६ वर्षीच्या अर्थसंकल्पात ५० लाख रूपयांची तरतूद पालिकेने केली आहे २०१४-१५ वर्षीच्या अर्थसंकल्पात ३० लाख रूपयांची तरतूद के ली होती.शहरातून दररोज ४० टन ओला व सुका कचरा गोळा केला जातो. शहरासह वाढीव हद्दीतून गोळा केला जाणाऱ्या घन कचऱ्यास तेवढा खर्चही मोठ्या प्रमाणात येतो. घनकचरा गोळा करण्यासाठी पालिकेकडून दिवसाकाठी १३ हजार रूपये तर वर्षाकाठी ५० लाख रूपये इतका खर्च पालिकेकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी केला जातो. एवढ्या मोठ्या कचऱ्याचे होणार तरी काय, असा प्रश्न नागरिकांना सतावतो आहे. हा प्रकल्प परिसरासाठी डोकेदुखी ठरला आहे. पार्ले-बनवडीकरांचा विरोधपालिकेकडून शहराबाहेर घनकचरा बायोगॅस प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानुसार पार्ले-बनवडी या गावच्या हद्दीत एकूण १४ एकर जागेत हा प्रकल्प उभारण्यात येणार होता. मात्र, या प्रकल्पास पार्ले-बनवडी येथील ग्रामस्थांनी विरोध दर्शविल्याने पालिकेला प्रकल्प उभारता आला नाही. तो बाराडबरी या ठिकाणी उभारण्यात यावा, असा निर्णय पालिकेने घेतला.पालिकेची स्वच्छता टीमपालिकेच्या आरोग्य विभागाकडून १ कॉम्पॅक्टर, २ डंपरप्लेसर, ३ टॅक्टर, १६ घंटागाड्या, १ रोड स्वीपर, ४८ कचरा कुंड्यांतून २१५ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कचरा एकत्रित केला जातो.