शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

खेडला तिरंगी लढतीचे संकेत

By admin | Updated: July 12, 2015 21:55 IST

सत्तासंघर्ष : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची ग्रामपंचायत

सातारा : लोकसंख्येच्या दृष्टिने महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाची ग्रामपंचायत अशी ख्याती मिळविलेल्या सातारा तालुक्यातील खेड ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे रण तापू लागले आहे.या निवडणुकीसाठी तीन पॅनेल पडण्याची चिन्हे आहेत. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील निवासस्थानी जाऊन एका गटाने खासदार उदयनराजे भोसले यांना नेतृत्वासाठी साकडे घातल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.सातारा शहरासह शेजारच्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मनोमिलनाची सत्ता आहे. हे दोन राजे ज्या बाजूने त्याच गटाची सत्ता संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असते. ग्रामपंचायतीच्या सत्ताकारणावरच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असल्याने विविध गटांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या राजकारणात विशेष लक्ष घातले आहे. दरम्यान, मूळच्या सातारा तालुक्यात पण कोरेगाव मतदारसंघात येणाऱ्या ग्रामपंचायतींवर आमदार शशिकांत शिंदे व माजी खासदार लक्ष्मणराव पाटील या दोन गटांची सत्ता आहे.मतदारसंघ पुनर्रचनेत खेड ग्रामपंचायत कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत गेली आहे. या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीअंतर्गत तीन गट आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांना मानणारा एक, आमदार शशिकांत शिंदेंना मानणारा व तिसरा माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे नेतृत्व मानणारा असे तीन गट येथे कार्यरत आहेत. सध्या आमदार शशिकांत शिंदे यांचे नेतृत्व मानणाऱ्या अनिल पवार यांच्या गटाची खेड ग्रामपंचायतीवर सत्ता आहे. या सत्तेविरोधात उर्वरित दोन गटांनी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांना एका गटाने साकडे घातले आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष रवी साळुंखे, हरिश्चंद्र लोखंडे, चंद्रकांत लोखंडे यांच्या गटाने नुकतीच पुणे येथे जाऊन पॅनेलचे नेतृत्व करण्याची विनंती उदयनराजेंकडे केली. या गटाला उदयनराजेंनी पूर्ण ताकद देण्याची तयारी दर्शविल्याची जोरदार चर्चा आहे. अनिल पवार यांच्या गटानेदेखील सत्ता अबाधित राखण्यासाठी अडाखे आखले आहेत. सुशील मोझर यांच्या गटानेही चाचपणी सुरु केली असून माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव मिलींद पाटील व दत्तानाना उत्तेकर यांच्या गटानेही ग्रामपंचायतीत शिरकाव करण्याची तयारी केली आहे. निवडणुकीसाठी विविध गट तयारीला लागले असून गुप्त बैठका, चर्चांना ऊत आलेला आहे. कोण कुणाशी हातमिळमिळवणी करणार?, हे काही दिवसांतच समोर येईल. गावात मात्र कोण कुणाच्या गटात असणार याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. निवडून येण्याची क्षमता व वॉर्डात असणारा प्रभाव याच्या आधारावर उमेदवार शोधण्याची मोहीम विविध गटांनी हाती घेतली आहे. यातून उमेदवारांची ओढा-ओढ होण्याची चिन्हे आता स्पष्ट होऊ लागली आहेत. प्रशासनाच्या दृष्टीनेही ही निवडणूक संवेदनशील म्हणून ओळखली जाते. त्यामुळे आत्तापासूनच प्रशासनाच्या वतीने या ग्रामपंचायतीकडे विशेष लक्ष ठेवले आहे. राजकारणात नव्यानेस सक्रिय झालेल्या युवकांवर प्रशासनाची विशेष नजर आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांच्या बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)एका गटाकडून उदयनराजेंना साकडे !सातारा तालुक्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सत्ता आहे. हे दोन राजे ज्या बाजूने त्याच गटाची सत्ता संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असते. सध्या खेड ग्रामपंचायत निवडणुकीबाबत काहीच ठोस अंदाज लागत नाही. मात्र एका गटाने उदयनराजेंना साकडे घातले आहे.3८ आॅगस्टला मतदानखेड गावची लोकसंख्या १९ हजारांच्या आसपास आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर ग्रामपंचायतीनंतर खेड ग्रामपंचायतीचा क्रमांक लागतो. येत्या ८ आॅगस्ट रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान होणार आहे. त्यामुळे आत्तापासून खेडमधील रणांगण तापले आहे. नागरिकांच्या भेटी गाठी सुरू झाल्या आहेत. कोण कुठल्या गटाचे आहे, याची चाचपणी सुरू झाली आहे.