शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसामुळे पाण्याच्या लोंढ्यात पर्यायी रस्ता गेला वाहून, कराड-चिपळूण मार्ग ठप्प

By प्रमोद सुकरे | Updated: June 16, 2025 16:57 IST

कराड-चिपळूण महामार्गाचे गेल्या २ वर्षांपासून काम सुरू

प्रमोद सुकरे कऱ्हाड: गेल्या २ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कराड-चिपळूण महामार्गावरील वाहतूक सोमवारी दुपारी पूर्णपणे ठप्प झाली. कोयनानगर ता.पाटण जवळील वाजेगाव येथे मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने तयार केलेला पर्यायी रस्ता सोमवारी सकाळी पाण्याच्या तडाख्याने वाहून गेला. त्याचा फटका वाहनधारकांना बसला आहे.वाजेगाव येथे मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने ठेकेदाराकडून मोरी टाकून तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला होता. या रस्त्यासाठी ठेकेदाराने मातीचा वापर केला होता. मात्र काल रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ओढ्यांना महापूर आल्याने पाण्याचा जोरदार लोंढा मोरीवर धडकला आणि ती वाहून गेली. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक वाहने ठिकठिकाणी अडकली आहेत.कराड-चिपळूण महामार्गाचे गेल्या २ वर्षांपासून काम सुरू असून अजूनही मुख्य पूल पूर्ण झालेला नाही. त्यामुळे पर्यायी रस्त्यावरच संपूर्ण वाहतूक सुरू होती. मात्र या रस्त्याचा दर्जा अत्यंत हलका असल्याने अवघ्या काही तासांतच तो वाहून गेला आहे. सध्या या मार्गावर प्रवास करणे धोकादायक असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे.