वाढत्या कोरोना रुग्णाच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाच्या वतीने ४५ वर्षांपुढील नागरिकांना मोफत लसीकरण मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत कापील, गोळेश्वर येथील ग्रामस्थांना लस देण्यात आली. प्रत्येक मंगळवारी ही लस गावात देण्यात येणार असून, उर्वरित ग्रामस्थांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी सरपंच कल्पना गायकवाड़, उपसरपंच धोंडीराम मोरे, ग्रामपंचायत सदस्य नितीन ढापरे, पराग जाधव, ग्रामविकास अधिकारी पी.एस. केंगार, व्ही.जे. जगताप, आरोग्य अधिकारी पी.एन. जाधव, आरोग्यसेविका के.एच. पाटील, एस.एस. पाटील, आशासेविका जयश्री जाधव, रोहिणी जाधव, समन्वयक एस.एस. भोसले, उद्धव डांईगड़े आदींची उपस्थिती होती.
फोटो : ०७केआरडी०३
कॅप्शन : कापिल, ता. कऱ्हाड येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.