शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरणात ७७ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 19:05 IST

पाटण(जि. सातारा), दि. २९ : कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून पंधरा तासांत एक टीएमसीची भर पडली. धरणात ७७.६५ टक्के ८१.८६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाच्या वीजगृहातून २,१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

ठळक मुद्देधरण परिसरात पावसाचा जोर कायम पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी २,१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू चोवीस तासांत सरासरी १४.४ मिलीमीटर पाऊस रविवारी दरवाजे दोन फुटांनी उघडणार कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पाटण(जि. सातारा), दि. २९ : कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून पंधरा तासांत एक टीएमसीची भर पडली. धरणात ७७.६५ टक्के ८१.८६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाच्या वीजगृहातून २,१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.जिल्ह्यात शनिवारी पहाटे आणि शुक्रवारी दिवसभरात सरासरी १५५ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. सकाळी आठ वाजता झालेल्या चोवीस तासांत सरासरी १४.४ मिलीमीटर पाऊस झाला.

तालुकानिहाय पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा :

सातारा १.८, जावळी ११.३, पाटण ३४.५, कºहाड ८.३, कोरेगाव ०.४, खंडाळा ४.२, वाई ६.५, महाबळेश्वर ८८.६.पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता गृहित धरून रविवारी सकाळी अकरा वाजता धरणाचे दरवाजे दोन फुटांनी उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.