शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

कण्हेर, तारळीतून पाणी सोडले

By admin | Updated: August 6, 2016 00:29 IST

सहा प्रकल्प ओव्हरफ्लो : महाबळेश्वरजवळील चाळीस गावांचा संपर्क तुटला

सातारा/पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरणात ८१.१३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील सहा प्रकल्पांमधून सुमारे ४३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. धोम, कण्हेर, वीर, उरमोडी, मोरणा-गुरेघर, तारळी प्रकल्पांतून पाणी सोडले जात आहे. महाबळेश्वर परिसरातील चाळीस गावे संपर्कहीन झाली आहेत.सातारा शहरासह महाबळेश्वर, वाई, पाटण, कऱ्हाड, जावळी तालुक्यांमध्ये शुक्रवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. कोयना धरणात ५१,२४२ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. कोयना धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरणार आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या चोवीस तासांमध्ये कोयना येथे १३४, नवजा येथे २०७ तर १५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरण ते महाबळेश्वर या साठ किलोमीटर जलसाठ्याच्या विस्तीर्ण खोऱ्यातून विविध नाले-ओढे छोट्या नद्यांना आलेल्या पुराचे पाणी कोयना धरणात मिसळत आहे. अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील पन्नास गावांना फटका बसला असून, काही गावांचा विद्युतपुरवठा बंद झाला आहे. तर काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. (प्रतिनिधी)तीन वर्षांत प्रथमच ‘धोम’मधून पाण्याचा विसर्गजिल्ह्यातील पावसाचा जोर वाढल्याने धोम धरणातून तीन वर्षांमध्ये प्रथमच शुक्रवारी पाणी सोडण्यास प्रारंभ केला आहे. धरणातून १०,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच कण्हेरमधून ८,६४०, वीर १३,६७१, उरमोडी २,०४७, मोरणा-गुरेघर ३,५७८, तारळी ५, ६ ८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पसरणी घाटात रस्ता खचलापाचगणी : पाचगणी व परिसरात कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून, दांडेघर (ता. महाबळेश्वर) या गावाजवळ पाचगणी-वाई या पसरणी घाटाच्या आरंभीच रस्ता खचल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्याच्या बाजूला असणारे संरक्षक कठडेच सरकून डोंगराच्या दिशेने गेले आहेत. या ठिकाणी डोंगरभागात जमीन सरकल्याने वृक्षसंपदाही मातीबरोबर वाहून गेली आहे. चतुरबेट पूल पाण्याखाली महाबळेश्वर : येथे शुक्रवारी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. महाबळेश्वरपासून १४ किलोमीटर अंतरावरील वाडाकुंभरोशी येथील चतुरबेट पूल पाण्याखाली गेल्याने सुमारे ३० ते ४० गावे संपर्कहीन झाली आहेत. महाबळेश्वरमध्ये २४ तासांत १५९.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.कोयना धरणातून पायथा वीजगृहासाठी आज, शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून २,१११ क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कायम राहिल्यास दरवाजांतून पाणी सोडण्याबाबत विचार केला जाईल.- ज्ञानेश्वर बागडे,कार्यकारी अभियंता, कोयना धरण.