शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
4
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
5
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
6
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
7
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
8
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
9
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
10
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
11
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
12
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
13
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
14
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
15
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
16
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
17
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
18
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
19
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
20
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?

कडाक्याच्या थंडीने ‘कांदा’ जोमात

By admin | Updated: January 9, 2015 00:05 IST

परळी खोऱ्यातील चित्र : शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, उतारा चांगला मिळण्याची अपेक्षा

परळी : परळी खोऱ्यातील परिसरात दरवर्षीच रब्बी हंगामात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. दोन वर्षांपासून किंचित घट झाली असली तरी पंधरा दिवसांपासून पडणाऱ्या कडक थंडीमुळे कांदा पिकाची वाढ जोमाने होत असून, उत्पादक वर्ग सुखावला आहे. या पिकांना थंडीची साथ मिळाल्याने उतारा चांगला मिळणार आहे. त्यामुळे वर्गाला चांगल्या दराची अपेक्षा आहे. यावर्षी कांदा दराने उच्चांक गाठल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून कांद्यासाठी पोषक अशी थंडी पडू लागली आहे. दरवर्षीच रब्बी हंगामात याठिकाणी कांद्याचे उत्पादन चांगल्या प्रकारे घेतले जाते. या पिकाला थंडीची गरज भासते. थंडीची योग्य प्रमाणात साथ मिळाल्यास कांदाही आकाराला मोठा होऊन तो चांगला पोसला जातो. शिवाय त्यांची काढणीही चांगल्या प्रकारे साधली जाते. यावर्षी कांद्याचे वाढलेले दर पाहून या भागातील शेतकऱ्यांनी आॅक्टोबर महिन्यांपासून कांदा लावणीस सुरुवात केली; पण काही दिवसांपूर्वी झालेल्या अवेळी पावसामुळे काही ठिकाणचे पीक हातचे जाण्याची परिस्थिती निर्माण णाली. मात्र शेतकऱ्यांनी पुन्हा जोमाने औषधांची फवारणी करून धोक्यात सापडलेले पीक जगविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सध्या पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीची साथ या आठवणींना मिळाल्याने उत्पादन चांगल्या प्रकारे घेण्याची आशा शेतकरी वर्गाला लागून आहे. या भागातील सोनवडी, गजवडी, भोंदवडे, डबेवाडी, अंबवडे व शेंद्रे परिसरातील बऱ्याच गावामधील शेतकऱ्यांनी उसामध्ये आंतरपीक म्हणून कांद्याचे उत्पादन घेतले आहे.(वार्ताहर)थंडीमुळे पीक सुधारण्यास मदतगेल्या पंधरवड्यापासून थंडीचा जोर वाढला आहे. थंडीचा जोर विकासासाठी फायद्याचा ठरतो. कांद्याच्या पातीचा वेगळारंग प्राप्त होऊन काळोखी येते. तसेच रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. त्याशिवाय आवश्यक असणारा रंग प्राप्त होण्यास सुरुवात होते. त्यामुळे कांद्याला सर्वच दृष्टीने थंडी फायदेशीर ठरते.