फलटण : निर्यात क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या के. बी. एक्स्पोर्ट या कंपनीमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त कंपनीचे संचालक सचिन यादव यांच्या कल्पनेतून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले होते. कंपनीमधील ६१ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून देशासाठी असलेले कर्तव्य निभावले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त पुरुषांबरोबर महिलांनासुद्धा समान वागणूक देण्याचा हेतू हा कायमच के. बी. ग्रुप ऑफ कंपनीचा असतो. महिला सबलीकरणाचा संदेश देण्यासाठी के. बी. एक्सपोर्टचे संचालक सचिन यादव यांच्या सुचनेनुसार के. बी. परिवारातील महिला अधिकारी अनिता राय यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले.
के. बी. ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये काम करत असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन कायमच कंपनीकडून दिले जाते. कष्ट व सचोटी असेल, तर अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम पदावर काम करण्याची संधी दिली जाते. यावेळी सर्वोत्तम काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन कंपनीचे संचालक सचिन यादव यांनी सन्मानित केले. (वा.प्र.)
२९केबी एक्स्पोर्ट
फलटण येथील के. बी. एक्स्पोर्ट या कंपनीमध्ये रक्तदान शिबिरप्रसंगी सचिन यादव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.