शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पाठीवर हात ठेवून फक्त ‘लढ’ म्हणा!

By admin | Updated: October 31, 2014 23:17 IST

हव्यात नागरी सुविधा : स्थलांतर थांबण्याचा मार्ग सुकर होईल केवळ रोजगारनिर्मितीतून

राजीव मुळ्ये - सातारारस्ता नाही. दळणवळणाची साधनं उपलब्ध नाहीत. पिकवलं तरी विकायचं कुठं हा प्रश्न. कष्टाची तयारी; पण दाम मिळणार का, ही शंका. कांदाटी खोऱ्यातल्या मावळ्यांना पाठीवर फक्त हवा ‘लढ’ म्हणणारा प्रशासनाचा हात. त्यांच्यासाठी मूलभूत नागरी सुविधांची दारं आता किलकिली झाली असली, तरी निधी मिळून प्रत्यक्ष कामं सुरू होण्याची आत्यंतिक गरज आहे.‘वन-जन जोडो’ अभियानाच्या टीमने मोरणी, म्हाळुंगे, आरव, वलवण, शिंदी, चकदेव अशा दुर्गम गावातल्या ग्रामस्थांशी संवाद साधला, तेव्हा इतर प्रकल्पग्रस्त आणि कोयना धरणग्रस्त यांच्यातला मूलभूत फरक लक्षात आला. तो म्हणजे १९७८ नंतरच्या प्रकल्पबाधितांना जो पुनर्वसन कायदा लागू आहे, तो कोयना बाधितांना नाही. त्यामुळं मूलभूत नागरी सुविधांसाठी तरतूदच नाही. काहींनी गाव सोडून अन्यत्र बस्तान बसवलं; पण जलाशयापासून वर सरकून राहिलेली गावं वर्षानुवर्षं तशीच राहिली. संस्कृती, खाणं-पिणं, पीकपद्धती सगळंच वेगळं असल्यामुळं ही माणसं दुसरीकडे स्थलांतरित झाली असती, तरी तिथं मूळ धरू शकली नसती. गाव सोडावं तरी पंचाईत, न सोडावं तरी अडचण अशी स्थिती!अभियानात सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांनी नागरी सुविधांबाबत ग्रामस्थांना दिलेला दिलासाही कोरडा नव्हता. उठून गेलेली गावे आणि वर सरकून राहिलेल्या गावांसाठी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना झालेल्या धोरणात्मक निर्णयाचं भक्कम पाठबळ त्यांच्या आश्वासनामागे होतं. या सुविधांसाठी तब्बल शंभर कोटींची तरतूद मावळत्या सरकारनं केली आहे.पाटबंधारे विभाग, मदत व पुनर्वसन विभाग आणि वन्यजीव विभाग या सर्वांचेच या मंडळींना सुविधा देण्यासाठी एकत्रित प्रयत्न सुरू असतानाच ‘वन-जन जोडो’ अभियान सुरू झाल्यामुळं ग्रामस्थांना दुहेरी दिलासा मिळालाय. ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’साठी वन्यजीव विभाग प्रयत्नशील असून, प्राथमिक नागरी सुविधांच्या यादीत आतापर्यंत अठरा सुविधा होत्या, त्या आता एकवीस झाल्या आहेत. या सुविधांची चर्चा उद्याच्या भागात!