शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याच्या बदल्यांसाठी मुंबईत न्यायालयीन लढाई-उच्च न्यायालयात अपील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 23:05 IST

सातारा : जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांचा गोंधळ साताºयात न आवरल्यामुळे शिक्षकांना आता कोर्टाची पायरी चढावी लागली. शिक्षक संघटनेच्या वतीने बुधवारी उच्च न्यायालयात बदली स्थगिती

सातारा : जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांचा गोंधळ साताºयात न आवरल्यामुळे शिक्षकांना आता कोर्टाची पायरी चढावी लागली. शिक्षक संघटनेच्या वतीने बुधवारी उच्च न्यायालयात बदली स्थगिती किंवा नव्याने प्रक्रिया राबविण्याची मागणी करणारे अपील दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रश्न तोडगा आता न्यायालयाच्या आदेशानेच निघणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सातारा जिल्ह्यात ८ हजार ८६० प्राथमिक शिक्षक आहेत. यापैकी सुमारे ३ हजार ८०० शिक्षकांनी आॅनलाईन अर्ज भरून आपल्या बदलीचा अर्ज शासनाकडे दाखल केला होता. या प्रक्रियेत सेवा ज्येष्ठतेची यादी जाहीर करणं अपेक्षित असताना ती यादी जाहीर न करता हातात थेट आॅर्डर दिल्यामुळे बदलीचे ठिकाणी बघून शिक्षकांना धक्का बसला. शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन झाल्या असल्या तरी त्या अन्यायकारक असल्याचा शिक्षकांचा आक्षेप होता.

याविषयी शिक्षकांच्या प्रतिनिधींनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास श्ािंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यानंतर मंगळवारी त्यांनी उपआयुक्तांकडे आपली बाजू मांडली. बदली प्रक्रिया भ्रष्टाचारमुक्त असल्याचे नमूद करून उपआयुक्तांनी अंमलबजावणीतील गोंधळावर टिपण्णी केली. मात्र, याविषयी ठोस निर्णयाप्रत न आल्याने समन्वय समितीच्या सदस्यांनी थेट मुंबई गाठून तिथे कायदेतज्ज्ञांशी न्यायालयातील लढ्याविषयी चर्चा केली. या चर्चेत उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बदली प्रक्रिया रद्द करावी किंवा नव्याने प्रक्रिया राबवावी, या दोन मागण्या अपिलाद्वारे येथे करण्यात आल्या आहेत.दुरुस्ती करणं वेळखाऊ अन् किचकटजिल्ह्यातील सुमारे ३ हजार ८०० शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी शिक्षकांना आक्षेप असलेल्या बदल्यांबाबत दुरुस्ती करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, जिल्ह्यातील सुमारे ११०० शिक्षकांच्या बदल्यांवर आक्षेप घेतले आहेत. या सर्वांची दुरुस्ती करणं वेळखाऊ आणि किचकट असणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया रद्द करणं आणि नव्याने प्रक्रिया राबवणं हेच त्यावरील पर्याय असल्याचे उच्च न्यायालयाचे वकील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांवर बदलीने भलतेच संकट आणले आहे. याच्या विरोधात दाद मागण्यासाठी उच्च न्यायालयात जाऊन बदली प्रक्रिया रद्द करण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. आमच्या मागणीचा न्यायालय योग्य सन्मान राखून निर्णय देईल, अशी अपेक्षा आहे.- राजेश बोराटे, सदस्य, शिक्षक समन्वय समितीबदलीतील आक्षेपज्येष्ठ शिक्षकांनी बदलीसाठी भरलेल्या शाळा त्यांना न मिळता त्या शाळ कनिष्ट शिक्षकांना देण्यात आल्या.काही शाळांमध्ये शिक्षकांची २ पदे आहेत, मात्र शाळेवर ३ आदेश दिलेसंवर्ग २ पती पत्नी अंतर ३० किलोमीटरपेक्षा कमी असताना एकत्रीकरण झालेसमानीकरणाची पदे रिक्त ठेवायची जाहीर केले असताना तिथे शिक्षक हजर केले.पदवीधरांची विषय गटानुसार नेमणुकांमध्ये अनियमितता.