शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

..अन् दुभाजकामुळे वाचले अनेक जीव!

By admin | Updated: December 23, 2016 23:05 IST

शंभर फुटावर मंडई : एसटी चालकाचे सुटले नियंत्रण

सातारा : पोवई नाका बसस्थानक रस्त्याच्याकडेला रोज सकाळी मंडई भरते. शुक्रवारी सकाळीही नेहमीप्रमाणे या रस्त्यावर नागरिक आणि व्यापाऱ्यांची धांदल सुरू असतानाच अचानक वडूज-ठाणे एसटीच्या चालकाचे नियंत्रण सुटले. चालकाने प्रसंगावधान दाखवून दुभाजकावर बस धडकवली. त्यामुळे केवळ शंभर फुटावर मंडई खरेदीसाठी असलेल्या नागरिकांचे जीव वाचले. या अपघाताच्या निमित्ताने रस्त्यावर भरत असलेल्या मंडईतील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.वडूज-ठाणे ही एसटी बस सकाळी पोवई नाक्यावरून बसस्थानकाकडे येत होती. एसटीने वळण घेतल्यानंतर आकार हॉटेलपासून पुढे रस्त्याच्याकडेला भाजी मंडई भरली होती. गाडीवरील आपले नियंत्रण सुटल्याची जाणीव चालकाला झाली. दुभाजकाला एसटी धडकवली नाही तर पुढे उतारावर भाजी विक्रीस बसलेल्या नागरिकांच्या जीवितास धोका संभविण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता चालकाने प्रसंगावधान दाखवून एसटी दुभाजकाला धडकवली. एसटी जोरदार धडकल्याने आतील रघुनाथ नारायण जाधव (वय ५४ रा. गुरसाळे, ता. खटाव) यांच्यासह अन्य प्रवाशीही किरकोळ जखमी झाले. एसटीतून खाली उतरल्यानंतर समोर असलेली नागरिकांची गर्दी पाहून प्रवाशांच्या काळाजाचा थरकाप उडाला. चालकाने ही एसटी दुभाजकाला धडकवली नसती तर या विचारानेच अनेक प्रवाशांच्या अंगावर अक्षरश: काटा आला. ड्रायव्हिंग सीटवरून चालक खाली उतरल्यानंतर काही नागरिकांनी चालकाला पाणी दिले. थोडावेळ खाली बसविले. त्यानंतर पोलिसांनी चालकाला थेट एसटी डेपोमध्ये नेले. नेमका काय प्रकार झाला, याची पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घेतली. एसटी महामंडळाने प्रवाशांना पर्यायी एसटी उपलब्ध करून दिली. (प्रतिनिधी)