शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

ज्वारीला दर काडीमोड... गहू-हरभराही मातीमोल

By admin | Updated: March 11, 2017 10:30 IST

हमीभाव घसरला : उत्पादन वाढले मात्र दराचे गणित कोलमडले

ज्वारीला दर काडीमोड... गहू-हरभराही मातीमोलहमीभाव घसरला : उत्पादन वाढले मात्र दराचे गणित कोलमडलेकातरखटाव : खटाव तालुक्यातील पूर्व भागात सध्या रामाच्या पारात, सध्या पहाटेच्या वेळी बळीराजांची साद ऐकायला मिळत आहे. यंदा रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांची कापणी सुरू असून, गहू-हरभऱ्याचेही दर ढासळले आहे. यावर्षी उत्पादन जादा झाल्यामुळे ज्वारी १८०० ते २००० रुपये प्रतिक्वि ंटल तर दुसरीकडे भरल्या गाडीला चिपाडाचं काय ओझ, अशी कडब्याची अवस्था झालेली दिसून येत आहे.रब्बी हंगामासाठी बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे ज्वारी असो अथवा अन्य कडधान्य उत्पादन भरघोस निघणार असल्याचे चिन्ह दिसून आले की व्यापारीवर्ग दर ढासळून ठेवणार ही ह्यकाळ्या दगडावरची पांढरी रेघ. त्यामुळे शेतक ऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, ह्यआवक वाढवावी तर चावतंय... न वाढवावी तर पळतंय,ह्ण अशी अवस्था झाली आहे. चार वर्षांच्या दुष्काळी वातावरणानंतर शेतकऱ्यांसाठी ज्वारीची भाकरी गोड लागणार असली तरी मालाची आवक वाढल्याने हमीभाव घसरला गेला आहे.तालुक्याच्या या पूर्व पट्यातल्या शेतक ऱ्यांच्या जमिनी म्हणजे पावसाच्या भरवशावरच्या जमिनी त्यामुळे सर्व खर्च भागून पदरी काही तरी पडावे, अशी अशा बाळगून बसलेल्या शेतक ऱ्यांच्या हाती प्रत्येकवर्षी चमत्कार घडत असतो. ह्यगेल्या हंगामात शेतक ऱ्यांच्या हाती नुसतं बाटूक ज्वारीचं उत्पादन फारच कमी..तर या हंगामात बाटुकाला भाव आला असून, ज्वारीच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून तालुक्याच्या पूर्व भागात जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. यावर्षी ज्वारीच्या विक्रमी उत्पादनामुळे कडब्याचेही उत्पादन वाढले असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न थोडक्यात मिटणार आहे. मागे वळून पाहता चारा छावण्यांच्या काळात अनेक राज्यकर्त्यांनी हात धुवून घेतले असले तरी गत काही वर्षांत छावण्यांची आवश्यकता भासत नसल्याचे दिसून येत आहे. कडब्यामुळे शेतकरी समाधानी असला तरी ह्यकभी खुशी कभी गमह्ण अशी अवस्था ज्वारी उत्पादकांची होणार आहे. अशाप्रकारे यंदा भरघोस उत्पादन झाल्यामुळे शेतकरी सुखावला असला तरी भाव कोसळल्यामुळे गणितच कोलमडल्या सारखे झालं आहे. (वार्ताहर)जुनी प्रथा लोप पावतेयअनेक प्रकारच्या पिकांची काढणी, मळणीची काम यंत्राच्या साह्याने होऊ लागली आहे. आता बाजारात नवनवीन कृषियंत्र येऊ लागल्यामुळे ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीच्या मशागती होऊ लागल्या आहेत. त्यामुळे कुंभार, लोहार या कारागिरांची कला लोप पावतं चालल्यामुळे जुन्या प्रथा हळूहळू मोडीत निघत आहेत.विळं मोडून खिळं करण्याची वेळ.. शेतकऱ्यांना मालाचा हमीभाव स्थिर राहिला पाहिजे. नक्की प्रशासन व्यापाऱ्यांच्या आड दडतंय की व्यापारी प्रशासनांच्या आड दडतायेत हेच कोडं शेतक ऱ्यांला अजून उलगडत नसल्यामुळे शेतकरी ह्यना घर का ना घाट काह्ण झाला आहे. खरीप आणि रब्बी हंगामात नक्की कोणती पिकं करावीत ते तरी सांगा. शेतक ऱ्याने उत्पादन वाढवलं की व्यापाऱ्याला निमित्त झालं म्हणून समजा दर ढासळून ठेवायला. त्यामुळे मालाला योग्य भाव मिळावा जेणेकरून ह्यविळं मोडून खिळंह्ण करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये.- नामदेव बागल, शेतकरी, कातरखटाव