शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शिवभक्त प्रतिष्ठानने जोपासली सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:38 IST

उंब्रज : सामूहिक संकटे येतात आणि जातात. या संकटकाळात मदत करण्यासाठी समाजातील काही घटक तेवढ्याच ताकदीने समोर येतात. माणुसकी ...

उंब्रज : सामूहिक संकटे येतात आणि जातात. या संकटकाळात मदत करण्यासाठी समाजातील काही घटक तेवढ्याच ताकदीने समोर येतात. माणुसकी जपतात. त्यापैकी एक म्हणजे येथील शिवभक्त प्रतिष्ठान. लोकांच्या मदतीतून पूरग्रस्तांना लाखों रुपयांची मदत करणारे हे शिवभक्त कोरोना काळात ही मागे राहिलेले नाही. तर त्यांनी उंब्रज व परिसरातील गरजू कोरोनाग्रस्त व त्यांच्या कुटुंबीयांना स्व खर्चाने जेवण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

येथील शिवभक्त प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम नेहमीच राबवले जातात. दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात जाऊन तेथील पूरग्रस्तांना उंब्रज मधील नागरिक, व्यावसायिक व शिवभक्त प्रतिष्ठानचे सदस्य यांनी जमा केलेल्या निधीतून लाखो रुपयांचे अन्नधान्य, कपडे व औषधे यांचे वाटप केले होते. लॉकडाऊन झाल्यानंतर नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस, होमगार्ड रस्त्यावर कर्तव्य बजावत आहेत. तर ग्रामपंचायत सफाई कर्मचारी कचरा साफ करून स्वच्छता करत आहेत. या सर्वांना गरम नाष्टा देण्याचा उपक्रम ही शिवभक्ततर्फे राबविण्यात आला.

कोट

सद्या कोरोना या संसर्गजन्य आजाराचा फैलाव सर्वत्र होत आहे. संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब कोरोना बाधित होऊ लागलेत. आजाराच्या तीव्रतेवर कुटुंबातील काही सदस्य दवाखान्यात तर काही घरी उपचार घेऊ लागलेत. यामुळे हे सर्व करताना कुटुंबातील प्रमुखांची तारांबळ उडत आहे. अशा कुटुंबातील सदस्यांना मोफत घरपोच जेवण देण्याचा उपक्रम शिवभक्त प्रतिष्ठानच्या वतीने सुरू केला आहे. यामुळे उंब्रज व परिसरातील गरीब व गरजू कोरोनाग्रस्त कुटुंबाना मदत मिळत आहेच. त्याच बरोबर त्यांचे मनोबल ही वाढत आहे.

विजय जाधव अध्यक्ष,शिवभक्त प्रतिष्ठान. उंब्रज