शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

जिमणवाडीची पुनर्वसन प्रक्रिया गतिमान

By admin | Updated: October 2, 2014 22:24 IST

संकट टळले : ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे प्रशासनाच्या हालचाली=लोकमतचा दणका

तारळे : गावकऱ्यांची एकजूट व प्रशासनाची तत्परता यामुळे जिमणवाडी, ता़ पाटण या गावच्या पुनर्वसन प्रक्रि येला गती मिळाली आहे़ चार-पाच वर्षांपासून रखडलेली ही पुनर्वसन प्रक्रिया गतिमान झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे़ डोंगराच्या मध्यभागी उतारावर जिमणवाडी गाव वसले असून, जवळपास ४६ कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत़ दळणवळणाच्या सुविधा नसल्याने या गावाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते़ चार-पाच वर्षांपासून अतिवृष्टीने जमीन खचत जाऊन डोंगर माथ्यावरील तीन महाकाय दगड गावावर कोसळण्याच्या स्थितीत होते़ त्यामुळे गावावर टांगती तलवार होती़ रस्त्याची गैरसोय असताना ही गावाने ‘निर्मल ग्राम’ पुरस्कार मिळविला आहे; पण प्रशासनाने गावच्या प्रश्नांकडे मात्र डोळेझाक केली़ धोकादायक दगड प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील फक्त कागदी घोडे नाचविण्याचे काम प्रशासनाकडून होत होते़‘लोकमत’ने या गंभीर प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले़ त्यानंतर, पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळाली़ गावाच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, गावकऱ्यांनी सतत पाठपुरावा व समन्वयाने तोडगा काढत गावालगतची जमीन बिनशर्त पुनर्वसनासाठी देण्याची तयारी दर्शवली आहे़ पाटणचे तहसीलदार, गटविकास अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी पुनर्वसन प्रक्रियेत सहभाग घेतला आहे़ जिमणवाडीतील ४६ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे़ आणखी आठ कुटुंबांचे वाढीव प्रस्ताव दाखल करण्याचे काम सुरू आहे़ (वार्ताहर)ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण जिमणवाडी गावाच्या समस्या व या गावावर ओढवू पाहणारे संकट, याबाबत वेळोवेळी ‘लोकमत’ने आवाज उठविला़ गावाच्या डोक्यावर तीन महाकाय दगड कोसळण्याच्या स्थितीत असून, मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचेही ‘लोकमत’ने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले़ त्यामुळे प्रशासनाने तातडीने हालचाली करून या गावाच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार केला़ तसेच त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून त्याला मंजुरीही घेतली़ ‘लोकमत’च्या या भूमिकेमुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केले जात आहे़आम्ही वेळोवेळी गावात जाऊन सूचना देत आहोत़ तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्वसन प्रक्रिया सुरू झालेलीआहे. निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर तयार झालेले अहवाल पुढील कारवाईसाठी पाठवण्यात येतील़ - एऩ डी़ पाटील, तलाठी