शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जीपचालकावर हल्ला, महामार्गावर थरार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:05 IST

शिरवळ : लगडवाडी (ता. वाई) येथून जीपमधून घर साहित्य भरून मुंबईकडे निघालेल्या जीपचालकासह दोघांना बांबूने मारहाण करीत जीपचे नुकसान ...

शिरवळ : लगडवाडी (ता. वाई) येथून जीपमधून घर साहित्य भरून मुंबईकडे निघालेल्या जीपचालकासह दोघांना बांबूने मारहाण करीत जीपचे नुकसान केल्याप्रकरणी कारमधील अज्ञात पाचजणांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे काही काळ आशियाई महामार्गावर तणावाची व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, लगडवाडी येथील मनोहर यशवंत पवार हे जीप (एमएच ११ सीएच-००६०) मधून गोविंद मानसिंग कदम यांचे घर साहित्य घेऊन मुंबईला निघाले होते. दरम्यान, जीपचालक मनोहर पवार हे केसुर्डी गावच्या हद्दीमध्ये आले असता त्याठिकाणी पाठीमागून आलेल्या कारमधील तोंडाला कापड बांधलेल्या अवस्थेतील पाचजणांनी अचानकपणे जीपवर काठीने हल्ला चढविला.

यामध्ये जीपची काच फुटून चालक मनोहर पवार यांना समोरील बाजूचे दिसणे बंद झाले असता मनोहर पवार यांनी शिरवळ गावच्या हद्दीमध्ये एका हॉटेललगत महामार्गाच्या कडेला जीप लावली. यावेळी कारमधील अज्ञात व्यक्तींनी खाली उतरत मनोहर पवार व जीपमधील गोविंद कदम यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेमुळे काही काळ महामार्गावर तणावाची व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

या घटनेची फिर्याद मनोहर पवार यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे हे करीत आहे.