शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जयश्री गिरी यांच्या घरावर हल्ला

By admin | Updated: December 26, 2016 23:47 IST

पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल : राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याचा आरोप

मेढा : महिगाव, (ता. जावळी)च्या उपसरपंच व जावळी पंचायत समितीचे माजी सभापती सुहास गिरी यांच्या पत्नी जयश्री गिरी यांच्या घरावर हल्ला करून घरासह तीन वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वैभव शितोळे (रा. सायगाव) याच्यासह आणखी पाचजणांवर मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तिघांना अटक करून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, हे सारे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचे व यांनी हल्ला केल्यानंतर ‘ऋषीभाई शिंदे जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचे जयश्री गिरी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत जयश्री गिरी यांनी मेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, फिर्यादीत म्हटले आहे की, रविवार, दि. २५ रोजी रात्री एकच्या सुमारास मी घरात एकटी असताना वैभव शितोळे (रा. सायगाव), नितीन भोसले, सचिन सुंदर भोसले (रा. खर्शी), स्वप्निल डोंबे, सागर शिवणकर, अथर्व भोसले या सर्वांनी माझ्या घरावर लाथाबुक्क्यांनी व दगडांनी मारहाण करीत घराच्या पूर्व बाजूचा दरवाजा व खिडकीच्या काचा फोडल्या व घराच्या दरवाजासमोर असलेल्या गाड्या (एमएच ११ बीसी ७४७४) व (एमएच २० बीसी ३१६९) या दोन्ही गाड्यांवर दगडफेक करून काचा फोडून सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान केले. यावेळी मी आरडाओरडा केल्यानंतर माझ्या घराशेजारी राहणारे विलास पवार, किशोर पवार, चेतन भोसले वगैरे माझ्या मदतीला धावून आल्यानंतर हे युवक दुचाकी व दोन चारचाकी वाहनांतून पळून गेले. यावेळी त्यांनी ‘ऋषीभाई जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. तसेच ‘ऋषीभाईच्या नादाला लागाल तर खानदान खल्लास करू,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी मेढा पोलिसांनी वैभव शितोळे, नितीन भोसले, सचिन भोसले यांना अटक केली असून, अन्य तीनजणांवरही गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी जयश्री गिरी यांच्या घराच्या दरवाजावर व वाहनांवर दगड मारून दहशत निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी भा. दं. वि. कलम १४३, १४७, १४९, ३३६, ४४७, ४२७, ५०९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास मेढ्याचे सहायक पोलिस निरीक्षक वैभव कढाळे करीत आहेत.