शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

जावळीत १७ ग्रामपंचायतींची निवडणूक

By admin | Updated: July 13, 2017 14:56 IST

हालचाली गतिमान : केळघर, आनेवाडीचा समावेश

आॅनलाईन लोकमतमेढा (जि. सातारा), दि. १३ : जावळी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, शासनाच्या नवीन निर्णयानुसार आता होऊ घातलेल्या १७ ग्रामपंचायतींवर थेट सरपंचाची निवड होणार आहे. त्यामुळे राजकीय वतुर्ळात हालचाली गतिमान झाल्या आहेत. बालेकिल्ला म्हणून जावळी तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व असून, या १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेना, भाजप उतरणार काय याची उत्सुकता जावळीकरांना लागली आहे. या १७ ग्रामपंचायतींमध्ये केळघर, आनेवाडी, करहर, आखाडे, कुसुंबी या राजकीदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जावळी तालुक्यात केळघर, आनेवाडी, करहर, आखाडे, कुसुंबी, मोरघर, वालुथ, रामवाडी, सोमर्डी, घोटेघर, वाकी, रुईघर, नांदगणे, शिंदेवाडी, ओझरे, रिटकवली आदी १७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. हरकतींवर २५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

३ आॅगस्ट रोजी अंतर्गत प्रभाग रचनेला मान्यता देण्यात येणार आहे. याबाबत हरकती ११ जुलैपर्यंत जावळी तहसील कार्यालयात स्वीकारण्यात आल्या आहेत.यावेळी प्रथमच नागरिकांमधून थेट सरपंचाची निवड होत असल्याने नागरिकांच्यातही उत्सुकता वाढली आहे. तालुक्यातील केळघर, कुसुंबी, आनेवाडी, अखाडे, करहर या महत्त्वाच्या असणाऱ्या ग्रामपंचायतीचा सरपंच कोण होणार? याबरोबरच ही निवडणूक पक्षीय स्तरावर होणार की गट-तटाची याबाबत जनतेत जोरदार चर्चा सुरू आहे.

जावळी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असून, शिवसेना व भाजपदेखील जोर धरू लागल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर या १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत जनतेतून सरपंच निवड असल्याने साऱ्या जावळीकरांचे लक्ष लागले आहे.