शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जातपंचायत गजाआड!

By admin | Updated: March 4, 2016 23:51 IST

नराधम पित्यालाही अटक : पाचवडमधील गोपाळवस्तीत पिता-पुत्रीला मारहाण

पाचवड : स्वत:च्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्यासह संबंधित अल्पवयीन मुलीलाही पाचवडच्या गोपाळवस्तीमध्ये दोरखंडाने बांधून सर्वांसमक्ष अमानुषपणे काठ्यांचे फटके मारणाऱ्या सात पंचांना भुर्इंज पोलिसांनी गजाआड केले आहे. तसेच, ‘त्या’ पित्यालाही बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.गोपाळ समाजातील सर्जेराव पवार (रा. पाचवड), शिवाजी पवार (रा. सुरूर), सर्जेराव चव्हाण (रा. भुर्इंज), राजाराम चव्हाण (रा. कडेगाव), जीवन पवार (रा. नागेवाडी, ता. सातारा), दत्तू चव्हाण (रा. जोशी विहीर) आणि अरुण दिलीप जाधव (रा. पेरले, ता. कऱ्हाड) अशी अटक केलेल्या पंचांची नावे आहेत.याबाबत माहिती अशी की, गोपाळ समाजातील एक इसम मूळचा कर्नाटकातील असून, तो सध्या सातारा तालुक्यात राहत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या पत्नीचे निधन झाले. पत्नीच्या निधनानंतर त्याने स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेबाबत त्याने व त्याच्या मुलीने कुठेही वाच्यता केली नाही; परंतु पत्नीचे श्राद्धकार्य करताना आपल्या हातून मोठा अनर्थ झाल्याचा साक्षात्कार त्याला झाला. त्यानंतर त्याने ठिकठिकाणच्या जात प्रमुखांशी संपर्क साधून त्यांना आपल्या हातून घडलेला हा किळसवाणा प्रकार सांगितला. यावर उपाय म्हणून पाचवड येथील गोपाळ वस्तीत तातडीने सर्वानुमते जातपंचायत बोलावली गेली. शासनाने निर्बंध घातलेले असतानाही या जातपंचायतीमध्ये तो व त्याच्या अल्पवयीन मुलीस सात हजार रुपये दंड, तसेच प्रत्येकी दहा काठ्यांचे फटके मारण्याची शिक्षा ठोठाविण्यात आली. त्याप्रमाणे त्या दोघांना दोरखंडाने बांधून नंतर सर्वांसमक्ष अमानुषपणे काठ्यांनी दहा-दहा फटके मारण्यात आले. यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेला संपूर्ण समाज ही घटना उघड्या डोळ्यांने पाहत होता. त्या पिता-पुत्रीने ही शिक्षा निमूटपणे भोगल्यानंतरच त्यांना समाजात सामील करून घेण्यात आले. दरम्यान, येथीलच एक तरुण सचिन भिसे याने गुपचूपपणे या सर्व घटनेचे चित्रीकरण करून त्याची ‘व्हिडीओ क्लिप’ भुर्इंज पोलीस ठाण्यास स्वाधीन केल्यानंतर यंत्रणा कामाला लागली. पोलिसांनी गोपाळ समाजातील सात पंचांविरुद्ध फिर्याद दाखल करून घेतली. नंतर भुर्इंजचे सहायक पीएसआय पवार यांनी जातपंचायतीत उपस्थित असणाऱ्या सर्व पंचांना ताब्यात घेतले. हमीद दाभोलकर यांची गोपाळवस्तीस भेट पाचवड येथील गोपाळवस्तीतील घटनास्थळास अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस हमीद दाभोलकर यांनी शुक्रवारी भेट दिली. त्यांनी या घटनेची माहिती घेतली. अशा घटना घडू नयेत म्हणून काय उपाययोजना करता येतील, यासंबंधी भुर्इंजचे सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्याशी चर्चाही केली. /संबंधित वृत्त हॅलो १