शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
5
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
6
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
7
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
8
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
9
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
10
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
11
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
12
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
13
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
14
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
15
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
16
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
17
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
18
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
19
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

‘जंगलमॅन’चे डोळे उजळले!

By admin | Updated: April 1, 2015 00:05 IST

मोफत शस्त्रक्रिया : ‘नातेवाइकां’कडून भरभरून ‘उतराई’

सातारा : जंगलात एकटा राहून प्रतिकूलतेशी झगडणाऱ्या, निसर्गमित्रांना जंगलवाचन शिकवणाऱ्या ८२ वर्षांच्या ‘जंगलमॅन’च्या डोळ्याची शस्त्रक्रिया एका निसर्गप्रेमी डॉक्टरने मंगळवारी मोफत केली. दरम्यान, या फाटक्या म्हाताऱ्यानं पुस्तकापलीकडचं ज्ञान देऊन जोडलेले ‘नातेवाईक’ त्याला भेटायला धावले आणि म्हाताऱ्याला रित्या हाती परत जाऊ द्यायचं नाही, असा निर्धार त्यांनी केला.जंगली श्वापदांना केवळ वासावरून ओळखणारे मालदेवचे शामराव कोकरे सोमवारी सातारच्या रस्त्यावर दिशाहीन फिरत असताना एका निसर्गप्रेमी मित्रानं त्यांना ओळखलं आणि इतर मित्रांना कळवलं. तीन दिवसांपासून उपाशी असणाऱ्या शामरावांना घरी नेऊन विचारपूस केली. डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी ते आले असल्याची माहिती मिळताच डॉ. मिलिंद भाकरे यांनी तातडीनं त्यांच्या तपासण्या केल्या आणि मंगळवारी सकाळी यशस्वी शस्त्रक्रियाही केली. दरम्यान, या काळात ‘जंगलमॅन’ साताऱ्यात अवतरल्याची आणि त्याची सांपत्तिक स्थिती गंभीर असल्याची माहिती ‘लोकमत’च्या माध्यमातून असंख्य निसर्गप्रेमींपर्यंत पोहोचली होती. भांडवल विकल्यामुळं आणि श्वापदांनी खाल्ल्यामुळं आता शामरावांकडे फक्त चार गुरं राहिली आहेत आणि अन्नान्नदशा होऊनही ते जंगलातच राहण्यावर ठाम आहेत, ही जिद्द त्यांना भावली.कोयनेत फिरताना शामरावांचा पाहुणचार घेतला. त्यांच्याकडून जंगल समजून घेतले. आता त्यांच्यासाठी काही करण्याची वेळ आपली आहे, ही जबाबदारी सर्वांनी ओळखली. सोमवारी दुपारपासून फोनाफोनी करून अनेक निसर्गप्रेमींनी शामरावांची चौकशी केली होती. मंगळवारी शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांना भेटायला अक्षरश: गर्दी लोटली. दरम्यान, त्यांना रिकाम्या हाती परत जाऊ द्यायचं नाही, असा निर्धार जंगलप्रेमींनी केला असून, त्या दृष्टीनं जमवाजमव सुरू केली आहे. काही दिवस आराम केल्यावर शामराव जंगलात परततील ते या ‘नातेवाइकां’चं भरीव प्रेम सोबत घेऊनच! (प्रतिनिधी)सोशल मीडियावरून आवाहनेशामरावांंना साताऱ्यातून जाताना भरपूर धान्य, कपडे, वस्तू, पैसे सोबत घेऊनच पाठवायचं, हे निश्चित झालंय. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचे सोशल मीडियावर अनेक ग्रुप्स असून, त्यावर यासंबंधीची आवाहने मंगळवारी दुपारपासून फिरू लागली आहेत. शामरावांना भेटायला येणारा कोणीही रिकाम्या हाती येत नाही. शिधा आणि सामग्री घेऊन डोंगरावरचं घर गाठणं ८२ वर्षांच्या शामरावांना अवघड जाणार आहे. त्यामुळं त्यांना सोडायला घरापर्यंत जायचं असंही काहींनी ठरवलंय.