शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जांबचे सहा ग्रामपंचायत सदस्य अपात्र

By admin | Updated: September 11, 2015 00:43 IST

अपर जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल : निवडणुकीचा हिशेब न दिल्याप्रकरणी कारवाई

सातारा : कोरेगाव तालुक्यातील जांब खुर्द ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांना अपात्र ठरविण्याचा निकाल अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी दिला आहे. निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्च न दिल्याचा फटका अपात्र सदस्यांना बसला आहे. नंदा बाळकृष्ण शिंदे, राजेंद्र बबन घोरपडे, कविता दशरथ घाडगे, राणी शरद घोरपडे, साधना बाळासो लोंढे, दस्तगीर निजाम मुलाणी (सर्व रा. जांब खुर्द) अशी अपात्र ठरलेल्या सदस्यांची नावे आहेत. जांब खुर्द ग्रामपंचायतीमधील सात जागांपैकी सहा सदस्य अपात्र ठरले आहेत. याप्रकरणी जांब खुर्द येथील विवेक प्रदीप शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेत अपात्र ठरलेल्या सदस्यांनी २३ आक्टोबर २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत निवडणुकीतील खर्चाचा तपशील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिला नाही, त्यामुळे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ ख (१) अन्वये त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, असे म्हटले होते. दरम्यान, या संदर्भाने अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी दोन्ही बाजूंच्या पक्षकारांना नोटिसा काढून ८ जून २०१५ ही सुनावणीची तारीख ठेवली. दोन्ही बाजूंचे वकीलपत्र दाखल करून घेण्यात आले होते. या प्रकरणात अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. यापैकी नंदा शिंदे, राजेंद्र घोरपडे, कविता घाडगे, साधना लोंढे यांनी आपले लेखी म्हणणे अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले होते. उर्वरित राणी घोरपडे, दस्तगीर मुलाणी यांना संधी देऊनही त्यांनी आपले म्हणणे सादर केले नाही. ज्यांनी म्हणणे सादर केले ते समर्थनीय नसल्याचे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांनी निवडणूक खर्च सादर न केल्याच्या निष्कर्षाप्रत आल्याने अपर जिल्हाधिकाऱ्यांनी ५ सप्टेंबर २०१५ रोजी या प्रकरणात निकाल देऊन सहा सदस्यांना अपात्र ठरविले. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. अभिजित माने, अ‍ॅड. भय्यासाहेब जगदाळे व अ‍ॅड. सतीश कदम यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी) अपात्र सदस्यांवर पाच वर्षे निर्बंध अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविलेल्या या सहा ग्रामपंचायत सदस्यांना पाच वर्षे निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांना आता पाच वर्षे निवडणूक लढविता येणार नाही, असे या निकालपत्रात स्पष्टपणे म्हटले आहे. आणखी एकाचा ‘स्वाइन’मुळे मृत्यू सातारा : जिल्ह्यातील स्वाइन फ्लूच्या साथीने सहावा बळी घेतल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना माण तालुक्यातील एका रुग्णाचा झालेला मृत्यू स्वाइन फ्लूमुळेच झाला असल्याचे वैद्यकीय अहवालातून दिसून आले आहे. आनंद दगडू जगदाळे (वय ४०, रा. डांगिरेवाडी, ता. माण) असे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाचे नाव आहे. त्यांना मंगळवारी (दि. ८) जिल्हा रुग्णालयात स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी रात्री त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्या रक्ताचा नमुना तपासणीचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला असून, त्यात हा मृत्यू स्वाइन फ्लूमुळेच झाल्याचा निष्कर्ष आहे. जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे आणखी दोन रुग्ण उपचार घेत असून, पाच संशयितांना उपचारांसाठी दाखल केले आहे. (प्रतिनिधी)