शहरं
Join us  
Trending Stories
1
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
2
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
3
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
4
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
5
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
6
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
7
'ब्लड मनी' घेण्यास तलालच्या कुटुंबाने दिला नकार! येमेनमधल्या निमिषा प्रियाला वाचवण्याची एकमेव आशाही धूसर?
8
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...
9
Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
10
भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित?
11
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
12
Guru Purnima 2025: स्वामी समर्थांची 'ही' एक शिकवण बदलून टाकेल आपले आयुष्य!
13
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
14
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
15
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
16
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
17
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."
18
"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद
19
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
20
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 

‘जय’ हो.. गोरेंचे उपोषण सुटले !

By admin | Updated: January 22, 2016 00:51 IST

चारही मागण्या मान्य : विभागीय सहनिबंधकांची मध्यस्थी यशस्वी

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कार्यपद्धतीविरोधात बँकेचे संचालक आमदार जयकुमार गोरे यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी बँकेतर्फे चार मुद्द्यांबाबत मान्यतेचे लेखी पत्र देण्यात आले. या पत्रानंतर गुरुवारी दुपारी माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते फळांचा रस घेऊन गोरे यांनी उपोषण सोडले. यावेळी ‘जय हो’च्या तालात बँकेसमोर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास या बाबतचे पत्र गोरे यांच्याकडे सादर केले. यावेळी जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम, रणजितसिंंह नाईक-निंबाळकर, धैर्यशील कदम, अंकुश गोरे, दिगंबर आगवणे, संतोष जाधव व इतर शेतकरी उपस्थित होते. (पान १ वरून) ‘जिल्हा बँकेतील रावणी विचाराविरोधातील लढाई जिल्ह्यातील शेतकरी सहकाऱ्यांच्या मदतीने मी जिंकली असून, बँकेतील भ्रष्टाचाराबाबत आता यापुढे मी कुठे लढायचे हे नक्की ठरवेन. बँकेतील चांगल्या निर्णयाबाबत मी सत्ताधाऱ्यांसोबत राहीन; पण चुकीच्या कारभाराविरोधात न्याय मागण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही,’ अशी भावना गोरे यांनी उपोषण मिटल्यानंतर व्यक्त केली.विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलेल्या सूचनेनंतर कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांनी बुधवारी रात्री जिल्हा मध्यवर्ती बँकेत येऊन बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक लक्ष्मणराव पाटील, नितीन पाटील, राजेंद्र राजपुरे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्यासह गोरेंच्या वतीने अ‍ॅड. अरुण खोत, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, अंकुश गोरे यांनीही सहभाग घेतला. बुधवारी रात्री अडीचपर्यंत हे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. सत्ताधाऱ्यांनी गोरेंच्या तीन मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शविली; पण कर्ज मंजुरीचे कार्यकारिणी समितीकडील अधिकार संचालक मंडळाला द्यावेत या मागणीबाबत बँकेकडून होकार मिळत नव्हता. संचालक मंडळानेच यापूर्वी कार्यकारिणी समितीला सर्व अधिकार बहाल केल्याचा खुलासा बँकेतर्फे करण्यात आला. केवळ एका वाक्यासाठी काथ्याकूट !विभागीय सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांनी सहकार कायद्यातील तरतुदीनुसार कर्ज वाटपाचे अधिकार कोणाला द्यायचे, याबाबत पुन्हा ठरावाची सूचना बँकेला दिली. या विषयावर बराच वेळ कायद्याचा काथ्याकूट झाला. गोरे यांचे शिष्टमंडळ व सत्ताधारी यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या सुरू होत्या. अखेर बँकेने पत्र दिले. कार्यकारिणी समितीला कर्ज वाटपाचे अधिकार देण्यापूर्वी संचालक मंडळाचा नवीन ठराव करून घेण्याचहीे निश्चित केले.या मुद्द्यांबाबत दिले पत्र!1कर्ज मंजुरी, वाटपाबाबत स्पष्ट तरतूद नमूद करून कार्यकारी समितीला अधिकार बहाल करण्यासाठी ठराव घेणे2 बँकेच्या सभेच्या पाच दिवस आधी मागील सभेचे इतिवृत्त व तीन कार्यकारी समिती सभांची इतिवृत्ते ई-मेल, आर. पी. ए. डी द्वारे तसेच गोरे यांच्या दहिवडी कार्यालयात समक्ष देणे3कार्यकारी समिती सभेचे इतिवृत्त पाठविताना कर्ज प्रकार व विकास संस्थानिहाय कर्ज मंजुरीचा तपशील सभेपूर्वी पाच दिवस आधी गोरे यांना देणे4 संचालक मंडळ सभेची विषयपत्रिका सभेपूर्वी पाच दिवस गोरेंना ई-मेल, आर. पी. ए. डी. द्वारे तसेच दहिवडी येथे गोरे यांच्या कार्यालयात समक्ष देणे