शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘सोशल मीडिया’वर फिरला इवलासा ससा

By admin | Updated: May 19, 2017 00:19 IST

‘सोशल मीडिया’वर फिरला इवलासा ससा

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : हल्ली सोशल मीडियावर काय येईल ते सांगता येत नाही. असाच एक किस्सा बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घडला. इवलासा ससा चुकून सरकारी कार्यालयात घुसला.. अन् नंतर पाहता-पाहता अख्ख्या सोशल मीडियावर फिरला. साताऱ्याच्या कृष्णानगरमधील गुण नियंत्रण विभागात शाखा अभियंता वर्षा ससाणे या संगणकावर काम करत असताना अचानक त्यांच्या कम्पार्टमेंटमध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आला. कार्यालयातील सर्वजण काय आहे, याची चौकशी करू लागले. प्रथमत: ते मांजर असल्याचा कयास बांधला गेला. मात्र, ते मांजर नसून ससा असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. घाबरलेला ससा कार्यालयात इकडून तिकडे सैरावैरा धावू लागल्याने कार्यालयाचे सर्व दरवाजे बंद केले गेले. त्याचा शोध घेतला असता तो एका केबीनमध्ये घाबरलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या पायाला जखम झाल्याचे दिसले.संबंधित विभागातील सहकाऱ्यांनी ससा जखमी असल्याचे पाहून त्याला बाहेर न सोडता कार्यालयातच कोंडून ठेवले. बाहेर सोडले तर कुत्रे त्याचा फडशा पाडतील म्हणूनजवळच असलेल्या वनविभागाच्या कार्यालयात सशाला घेऊन वर्षा ससाणे या गेल्या. जखमी असलेल्या सशाला त्यांनी वनविभागाच्या स्वाधीन करून त्याची जखमी वन्यप्राणी, पक्षी रजिस्टरमध्ये नोंद केली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी सशाला उपचारासाठी घेऊन गेले. तेव्हा आम्ही त्याची योग्य प्रकारे काळजी घेणार असल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. या साऱ्या घडामोडी दिवसभर सोशल मीडियावर फिरल्या.पाण्यासाठी परिसरात दाखल.. दुपारच्या सुमारास ससा पाण्याच्या शोधासाठी आला असावा, असा कयास येथील कर्मचाऱ्यांनी बांधला आहे. यापूर्वी या परिसरात सशे फिरत असल्याचे काहींनी पाहिले आहे. पाणी पिण्यासाठी आले असता कुत्र्यांनी पाठलाग केला असावा आणि पळताना त्याच्या पायाला जखम झाली असावी, असे त्यांनी सांगितले. यापूर्वीही आसपासच्या परिसरातील जखमी प्राणी, पक्षांचे जीव वाचवून वनविभागाच्या ताब्यात दिले आहे, याची नोंदही जखमी ‘वन्यप्राणी, पक्षी रजिस्टर’मध्ये ससाणे यांच्या नावे आहे.