शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

ऐकावं ते नवलच... पती म्हणे पत्नी छळतेय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST

कऱ्हाड : संसार म्हटलं की वाद होणारच; पण जोपर्यंत वाद चार भिंतीत असतो तोपर्यंत घराला घरपण असतं. वाद पोलीस ...

कऱ्हाड : संसार म्हटलं की वाद होणारच; पण जोपर्यंत वाद चार भिंतीत असतो तोपर्यंत घराला घरपण असतं. वाद पोलीस ठाण्यात पोहोचला तर कुटुंबाची वाताहत सुरू होते. आजपर्यंत असे अनेक वाद पोलीस ठाण्यात गेलेत. पतीने शारीरिक, मानसिक छळ केल्याची तक्रारही पत्नींनी केलीय; पण आता चक्क ‘पत्नी छळतेय’ म्हणून पतीच पोलीस ठाण्यात जाऊ लागलेत. कऱ्हाडमध्ये तब्बल २९९ पतिराजांनी अशी तक्रार केल्याचं समोर येतंय.

कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात ‘कौटुंबिक विशेष कक्ष’ कार्यरत आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या कौटुंबिक तक्रारी सुरुवातीला या कक्षाकडे वर्ग केल्या जातात. तेथे संबंधितांचे समुपदेशन केले जाते. त्यातून तुटण्याच्या मार्गावर असलेली नाती पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला जातो. या कक्षाकडे दाखल होणाऱ्या तक्रारींपैकी बहुतांश तक्रारी पती-पत्नीमधील वादाच्या असतात. साधारणपणे पती छळ करीत असल्याचीच बहुतांश महिलांची तक्रार असते; पण गत काही वर्षांत पत्नी छळतेय, अशी तक्रार घेऊन काही पतीच या कक्षापर्यंत पोहोचलेत. पत्नी दुर्लक्ष करते, माझं ऐकत नाही, सासू सासऱ्यांशी जमवून घेत नाही, हेकेखोरपणे वागते, वारंवार वाद घालते, असंच काहीसं पतिराजांचं म्हणणं आहे. कधी-कधी पत्नीने हात उगारल्याची तक्रारही पतीने केली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या तक्रारींचे प्रमाण धक्कादायक आहे.

- चौकट

गत तीन वर्षांत...

एकूण दाखल तक्रारी : ४३७

पत्नींच्या पतीविरोधात : ३३०

पतींच्या पत्नीविरोधात : १०७

- चौकट

पतींनी दाखल केलेल्या तक्रारी

वर्ष : तक्रारी

२०१३-१४ : ४८

२०१४-१५ : ३३

२०१५-१६ : ३१

२०१६-१७ : ३६

२०१७-१८ : ४४

२०१८-१९ : ३२

२०१९-२० : ३१

२०२०-२१ : ४४

- चौकट

क्या करे, क्या ना करे..?

समुपदेशकांशी बोलताना अनेक पती तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतोय, एवढंच सांगतात. तिला सहज बोललं तरी ती आत्महत्येची धमकी देते. माहेरी जाईन म्हणते. स्वत:ला इजा करून घेते. काय करायचं तुम्हीच सांगा, असंही काही पती समुपदेशकांना विचारतात.

- कोट

पती आणि पत्नीमधील वाद टोकाला जाऊ नये, याची खबरदारी दोघांनीही घ्यायला हवी. सध्या महिलांबरोबरच अनेक पुरुषही येथे तक्रारी दाखल करीत आहेत. त्या तक्रारी सामोपचाराने मिटविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- सविता खवळे, समुपदेशक

अनेक पतींना अश्रू अनावर

‘पत्नीने अनेक वेळा माझ्याविरोधात नातेवाइकांकडे तक्रार केली आहे. तिचा तक्रारींचा पाढा कमी होत नाही. छोट्या-छोट्या गोष्टी ती तिच्या आई-वडिलांना सांगते. त्यांचा हस्तक्षेप होतो. हे सगळं सहन होत नाही,’ असे म्हणत काही पतींनी कक्षामध्ये अश्रूही ढाळलेत.

- चौकट

म्हणे.. कृतीतून राग दाखवते!

पती-पत्नीमध्ये वाद होणारच; पण वाद झाला तर तो कृतीतून दाखविण्यात काय अर्थ? असा प्रश्नच काही पतींकडून उपस्थित केला जातो. वाद झाला की ती आदळआपट करते. विनाकारण चिडचिड करते. तिच्या अशा वागण्याने माझी घुसमट होते, असे अनेक पतींनी समुपदेशकांना सांगितले आहे.

- चौकट

पती म्हणतात...

तिचं ‘हे’ चुकतंय...

१) हट्टी स्वभाव

२) आळशीपणा

३) संशयी स्वभाव

४) पालकांचा हस्तक्षेप

५) मुलांकडे दुर्लक्ष

६) आर्थिक ओढाताण

७) गैरसमज

९) मोबाईलवर चॅटिंग

९) कुटुंबाविषयी बेफिकीर

फोटो : २२केआरडी०४, ०५, ०६

कॅप्शन : प्रतीकात्मक