शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तात्यांमुळेच झाला मार्डी गावाचा कायापालट

By admin | Updated: April 1, 2016 01:50 IST

माणचे किंगमेकर सदाशिवराव पोळ : सिमेंट काँक्रीटचे रस्ते, लोकसहभागातून बंधाऱ्यांचे मोठे काम

शरद देवकुळे -- पळशी माण तालुक्यातील शिंगणापूर म्हसवड मार्गावर वसलेले मार्डी गाव आता प्रगतीच्या दिशेने घोडदौड करत आहे. गावात झालेले सिमेंट काँक्रीटचे रस्ते, शाळा, बाजारपेठ, सुसज्ज आरोग्य केंद्र, बँका आदी सुविधा दिसत आहेत. माणचे किंगमेकर आणि माजी आमदार दिवंगत सदाशिवराव पोळ यांचे गावाच्या प्रगतीसाठीचे योगदान मोठे आहे.पोळ तात्या राजकारणात येण्यापूर्वी गावात सुविधांची वानवाच होती. गावात पहिली ते सातवीपर्यंतच शाळा. त्यानंतरच्या शिक्षणासाठी गाव सोडावे लागत होते. तात्या राजकारणात आल्यानंतर शिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्यांचे लोंढे थांबविण्याचे त्यांनी ठरविले. त्यानंतर गावात माध्यमिक शाळा सुरू झाली. याबरोबरच बँक, पतसंस्था, ग्रंथालय यांची उभारणीही करण्यात आली. गावच्या सरपंच कौशल्या पोळ व उपसरपंच राहुल सावंत हे विकासाची परंपरा जपत आहेत. नुकतेच या गावाने डॉल्बीमुक्तीचा ठरावही केला. ग्रामपंचायतीने सांडपाण्याचे उत्तम नियोजन केले आहे. गावातील दोन विंधन विहिरींमार्फत व दोन मिनी वॉटर सप्लायमार्फत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. सध्या दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्याने भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष घटक योजनेंतर्गत आर्ट आॅफ लिव्हींगच्या माध्यमातून व मार्डी ग्रामस्थांच्या लोकवर्गणीयुक्त सहभागातून सीसीटीव्हीचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. तीन बंधाऱ्यांचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. गाव परिसरात बांधबंदिस्त व बंधाऱ्यांची कामे नेहमी सुरू असतात. पावसाचे पडलेले पाणी वाया जावू नये म्हणून पंधरा बंधारे ठिकठिकाणी बांधले आहेत. पावसाळ्यात हे बंधारे पुर्ण क्षमतेने भरल्यास भविष्यात पाणी टंचाईचा प्रश्न कायमचाच मिटेल अशी अशा येथील ग्रामस्थांना आहे.मार्डी ग्रामपंचायत आता ६८ वर्षांची झाली आहे. गावची लोकसंख्या पाच हजार असून, २२ वाड्या नांदत आहेत. शुक्रवार हा येथील आठवडी बाजार दिवस असून, गावात प्रशस्त बाजार पटांगण आहे. गावात हनुमान मंदिर, राम मंदिर, महालक्ष्मी मंदिर, खंडोबा मंदिर, भवानी देवी मंदिर असून, सालाबादप्रमाणे येथे यात्रा, उत्सव भरतात. गावात मतभेद असले तरी गावाच्या विकासाच्या आड कोणीही येत नाही. पोळ तात्यांची ही शिकवण गावकऱ्यांनी अजूनही जोपासली आहे.मार्डीचे ग्रामदैवत भवानी देवीचे मंदिर गावाच्या दक्षिणेला डोंगरावर आहे. ‘भवानी आईचा डोंगर’ या नावानेच ही पर्वतरांग ओळखली जाते. पोळ तात्यांच्या प्रयत्नातूनच या डोंगरावर जाण्यासाठी वाहनांना डांबरी रस्ता तसेच डोंगर चढण्यासाठी पायऱ्याही बांधल्या आहेत.गावात दुचाकीचे प्रमाण अधिक आहे. चारचाकी, ट्रॅक्टर, जेसीबी यांची संख्याही मोठी आहे. गावातील शेतकऱ्यांची शेती पावसावरच अवलंबून आहे. विहिरींमार्फत पिकांना पाणी दिले जाते.गेल्या तीन वर्षांपासून पाऊस वेळेवर होत नसल्याने गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा मार्ग अवलंबला आहे. ज्वारी, बाजरी, कांदा यासारखी पिके घेतली जातात. तर मार्डीचे डाळिंब फळ बागांचेही उत्पादन चांगले आहे. गावात तरूण मंडळे विधायक आणि सामाजिक उपक्रमात सक्रियपणे सहभाग घेत आहेत. व्यसनमुक्ती, पाणलोट अन् बरंच! डॉ. संदीप पोळ, डॉ. माधव पोळ, संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गावात प्रशिक्षण कार्यक्रम, आनंद अनुभूती कार्यक्रम, नवचेतना शिबिर, बसेकी कोर्स आदींचे आयोजन केले जाते. याबरोबरच व्यसनमुक्ती, पाणलोट विकास, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, स्त्रीभ्रूणहत्या याबाबतही जनजागृती केली जात आहे. मना मनावर उत्तम संस्कार घडत असल्याने गावात वादाविवाद होण्याचे प्रसंग अगदीच तुरळक आहेत.मार्डी गाव तिन्ही बाजूंनी डोंगर रांगांनी वेढलेले आहे. बंधाऱ्यांसाठी योग्य भौगोलिक रचना नसल्याने लोकसहभागातून आणखी बंधारे बांधण्याची योजना आहे. या सर्व कामांसाठी शासन दरबारी आम्ही अर्ज करून पाठपुरावा करत आहे.- कौशल्या पोळ, सरपंच मार्डी