शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

घोटभर पाण्यासाठी धडपड हाच त्यांचा दोष!

By admin | Updated: April 3, 2016 23:42 IST

महिन्यात सात बळी : मार्च महिन्यात पाण्यासाठी गेलेल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू

सातारा : पावसाचा आणि धरणांचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्यात कधीकाळी पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागेल, असे वाटलेही नसेल; पण यंदा मार्चपासूनच सातारकरांवर ही वेळ आली आहे. मार्च महिन्यात पाण्यासाठी गेलेल्या चौघांचा बुडून तर तिघांचा पाण्याच्या शोधात विहिरतीत उतल्यावर अपघाती मृत्यू झाला आहे. ‘घोटभर पाण्यासाठी धडपड...’ हा या सहा जणांचा दोष होता. सातारा जिल्ह्यालाही दुष्काळाचे चटके बसायला लागले आहेत. दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांसह कमी पाऊस पडलेल्या गावांमधून ‘पाणी द्या...’ असा टाहो फोडला जात आहे. गावागावातून टँकर, विंधन विहिरी, कूपनलिकांची मागणी केली जात असतानाच शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दुष्काळी बैठक घेतली. या बैठकीत सर्वच लोकप्रतिनिधींनी दुष्काळग्रस्तांच्या भावना पोटतिडकीने मांडल्या; पण प्रशासकीय अधिकारी ‘कागदी घोडे नाचवत दुष्काळ नाहीच’ असा आव आणत होते. राज्याला पाणी अन् वीज देणाऱ्या पाटण तालुक्यातील असवले येथील तरुणी कमल उत्तम असवले ही वाल्मीकी पठारावर असलेल्या विहिरीत पाणी आणण्यासाठी गेली असता पाय घसरून पडली. त्यात तिचा मृत्यू झाला. खंडाळा तालुक्यातील गुठाळे येथे पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेलेला रवींद्र दीपक चव्हाण (वय २३, सध्या रा. मावळ्याचा दरा गुठाळे, ता. खंडाळा मूळ रा. बोरामणी, ता. जि. सोलापूर) याचा मृत्यू झाला होता. फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथेही मंगल रवींद्र घाडगे यांचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला होता. या काळात सर्वात दुर्दैवी घटना कोरेगाव तालुक्यातील अरबवाडी येथे घडली. पोपट शंकर सावंत यांचा कोरड्या विहिरीत पडल्यामुळे मृत्यू झाला. पाणी आणण्यासाठी गेल्यामुळे या तरुणांचा मृत्यू असतानाच ग्रामीण भागात पाण्याचा शोध थांबलेला नाही. नवीन विहिरी घेण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी विहिरीत गाळ काढून पाण्याचा शोध घेतला जात आहे. पाणी शोधत असतानाही तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोरेगाव तालुक्यातील खेड नांदगिरी येथे विहिरीतील गाळ काढत असताना अपघात होऊन सजन चंद्रभान पटेल (वय १९) याचा मृत्यू झाला. तर जावळी तालुक्यातील भामघर येथे क्रेन डोक्यात पडल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला होता. कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे खुर्द येथे विहिर खोदताना यारी पडल्याने नंदकुमार कदम यांचा रविवार, दि. ३ रोजी मृत्यू झाला. जिल्ह्यात पाणीटंचाई नाही, असे सांगत असलेल्या प्रशासनाला या सहा जणांचे निधन दिसलेच नाही. दिसणारच कसे? कारण घोटभर पाण्यासाठी धडपड केली हाच त्यांचा दोष होता? असा सवाल तमाम जनतेतून होत आहे. (प्रतिनिधी)