शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अहिंसेच्या मार्गाने जाण्यासाठी खरं बोलणं जास्त महत्त्वाचं: वर्षा देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:57 IST

सातारा : ‘मकर संक्रांतीचा सण म्हटलं की तिळगूळ घ्या गोड बोला, हे फक्त म्हणणं उपयोगाचं नाही, ते कृतीत आणणंही ...

सातारा : ‘मकर संक्रांतीचा सण म्हटलं की तिळगूळ घ्या गोड बोला, हे फक्त म्हणणं उपयोगाचं नाही, ते कृतीत आणणंही महत्त्वाचं आहे. अहिंसेच्या मार्गाने जाण्यासाठी खरं बोलणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे बरं पेक्षा खरं बोलणं आणि त्यातून समाजात क्रांती निर्माण करणारं व्यक्तिमत्त्व घडवणं महत्त्वाचं आहे,’ असे मत लेक लाडकी अभियानाच्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी व्यक्त केले.सण, समारंभ पारंपरिक पद्धतीने साजरे न होता त्याला आधुनिकतेचीही जोड मिळणं आवश्यक आहे. रोजच्या जीवनाशी, व्यवहाराशी त्याचं सांगड घालणं गरजेचं आहे. राग येणं ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण चुकीच्या गोष्टीचा राग येणं आवश्यक आहे; पण राग व्यक्त करण्याची पद्धत सकारात्मक असली पाहिजे. राग आल्यामुळे आणि चुकीच्या गोष्टींच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे सामाजिक आंदोलने आणि चळवळी उभ्या राहत असतात; पण त्यातून हिंसा होणं गैरच आहे. चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या त्या व्यक्तींविषयी राग न धरता त्याला ती चूक का करावी वाटली, याचा विचार करून त्या बाबीविषयी राग येणं गरजेचं आहे. महात्मा गांधी याबाबत आमचे आदर्श आहेत. त्यांना चुकीच्या गोष्टींची प्रचंड चीड होती; पण त्यांनी कायम प्रेमाने, संयमाने आणि माणुसकीला साद घालून एखाद्यातील दुष्प्रवृत्तीला बाहेर काढलं. ती नाहीशी केली जाईल, याच पद्धतीने त्यांनी धरणे आंदोलन, उपोषणे आदी केली. अंहिसेच्या मार्गाने जाताना कायम गोड बोलणं हे एक मोठं शस्त्र ठरू शकतं. त्यामुळे गुड बोला किंवा गोड बोला, हे म्हणणं पुरेसं नाही, तसं पाहता बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणं महत्त्वाचं आहे. गोड बोलण्यापेक्षा कधीतरी कडवट बोललं तरी चालेल; पण समोरच्याचं हित होईल, अशा पद्धतीने आपण बोलणं गरजेचं आहे.राज्यात महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार याला आळा घालण्यासाठी समाज म्हणून सर्वांनी संघटित होणं आणि महिला अधिकारासाठी एकत्रित लढा उभं करणंही महत्त्वाचं आहे. बालविवाह रोखून आपण काही आयुष्य घडवू शकलो तर सणाचं निमित्त सार्थकी लागेल. सत्याच्या मार्गाने जाण्यासाठी, सत्याचा आग्रह धरत लढाऊपणे चीड आणणारी माणसंच हा समाज बदलू शकतील, अशी माझी धारणा आहे. आपण आपल्याला केवळ गोड बोलण्यापुरतं मर्यादित न ठेवता आपण चांगलं काम करुया, परस्परांशी गोड बोलता येईल, असं शांत, सुंदर, अहिंसक वातावरण महाराष्ट्रात निर्माण करूया, असं मला वाटतं.