शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

'उदयसिंहां'चं पक्षप्रवेशाचं ठरलं! फक्त 'अजितदादां'च्या तारखेचं उरलं; कराड दौऱ्यात काय घडलं?

By प्रमोद सुकरे | Updated: March 12, 2025 23:16 IST

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील यांच्या कोयना सहकारी बँकेत सुमारे १ तास वेळ दिला. २० मिनिटे बंद दाराआड चर्चाही केली तो उत्सुकतेचा विषय आहे.

-प्रमोद सुकरे, कराडराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी कराड दौऱ्यावर आले होते. त्यांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी जयंतीच्या निमित्ताने अभिवादन केले. पण त्यांच्या शासकीय दौऱ्यात नसतानाही त्यांनी काँग्रेसचे नेते अँड. उदयसिंह पाटील यांच्या कोयना सहकारी बँकेत सुमारे १ तास वेळ दिला. २० मिनिटे सभागृह बंद चर्चाही केली तो उत्सुकतेचा विषय आहे. त्यानंतर माध्यम प्रतिनिधिंनी उदयसिंह पाटलांचा प्रवेश कधी ?असे विचारल्यावर मी येथे सदिच्छा भेट द्यायला आलो होतो असे सांगत त्यांनी प्रश्नाला बगल दिली. पण अँड. उदयसिंह पाटलांनी मात्र पत्रकारांशी बोलताना 'आमचं राष्ट्रवादी प्रवेशाचं निश्चित ठरलं आहे, फक्त अजित पवारांच्या तारखेसाठी कार्यक्रमाचं उरलं आहे' असे सांगितले.त्यामुळे आता त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

कराड दक्षिण काँग्रेसचे नेते व दिवंगत विलासराव पाटील (उंडाळकर) यांचे वारसदार अँड. उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा गेल्या १५ दिवसापासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यातच दिवंगत लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांचे वारसदार खासदार नितीन पाटील व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी काही दिवसापूर्वी मुंबईत अजित पवार व उदयसिंह पाटील यांची भेट घडवून आणली ती प्रसार माध्यमांपासून लपून राहिली नाही. त्यामुळे उलट सुलट चर्चांना जोर आला. 

अजित पवारांची २० मिनिटे बंददाराआड चर्चा

त्यातच बुधवारी यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री पवार कराड दौऱ्यावर आले. त्यावेळी त्यांच्या शासकीय दौऱ्यात नसतानाही उदयसिंह पाटील यांच्या कोयना सहकारी बँकेस सदिच्छा भेट दिली. दिवंगत विलासराव पाटील (उंडाळकर) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. कार्यकर्त्यांशी संवादही साधला आणि अँड. उदयसिंह पाटील व त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी २० मिनिटे सभागृह बंद चर्चाही केली. ही चर्चा नेमकी काय झाली? या उत्सुकतेपोटी प्रसार माध्यमांनी अजित पवार यांना उदयसिंह पाटील यांचा प्रवेश कधी? असे छेडले पण त्यांनी मी फक्त सदिच्छा भेटीसाठी आलो होतो असे सांगत लगेच निरोप घेतला.

त्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी आपला मोर्चा पाटील यांच्याकडे वळवला आणि याच प्रश्नावर त्यांना छेडले. अगोदर आढेवेढे घेणाऱ्या उदयसिंह पाटलांनी अखेर 'हो आमचं प्रवेशाचं ठरलंय, आता फक्त अजित पवारांच्या तारखेसाठी उरलयं' तारीख मिळाली की आम्ही पक्षप्रवेश करू असे सांगून टाकले. त्यावेळी बंद सभागृहात नेमकी काय चर्चा झाली त्याचा सारांश समोर आला. आता उदयसिंह पाटीलांचा प्रवेशाचा मुहूर्त कधी निघणार? याचीच प्रतीक्षा उरलेली आहे. 

उदयसिह पाटलांना नेमकी काय दिलीय ऑफर? 

अजित पवारांनी कोयना बँकेला भेट दिली. पाहुणचारात त्यांनी 'खाल्ले 'कोयने'चे पेढे अन 'रयत'ची साखर, पण 'उदयसिंहां'ना नेमकी काय दिलीय ऑफर?' याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. याबाबत उदयसिंह पाटील यांनी मी काही मागणी केलेली नाही आणि त्यांनी काही शब्द दिलेला नाही असे जरी म्हटले असले तरी, विधान परिषदेवर संधी देण्यात येणार असल्याचे त्यांच्याच रयत संघटनेचे कार्यकर्ते खाजगीत सांगत आहेत.

पक्षप्रवेश अधिवेशनापूर्वी की नंतर? 

सध्या राज्य सरकारचे अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे अजित पवार त्यात गुंतलेले आहेत. त्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वी की अधिवेशन संपल्यानंतर ते उदयसिंह पाटलांना कार्यक्रमाची तारीख देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

अजूनही मी काँग्रेसमध्येच अजित पवारांच्या भेटीनंतर माध्यम प्रतिनिधींनी उदयसिंह पाटील यांना आज काँग्रेसचा एक कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रम पत्रिकेवर तुमचं नाव आहे. तुम्ही त्या कार्यक्रमाला जाणार आहात का? याबाबत छेडले असता अजून मी काँग्रेसमध्येच आहे. त्यामुळे कार्यक्रमाला जाणार असलेचे सांगितले. त्यावेळी एकच हशा पिकला.