शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

आर्थिकतेसह मानसिक भक्कमताही आवश्यक-१० हजार महिलांचे आर्थिक सक्षमीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 23:46 IST

'समृद्ध समाजासाठी फक्त आर्थिक सुबत्तेचा विचार करून चालणार नाही तर यामध्ये समजातील प्रत्येक घटकाच्या मानसिक स्वास्थ्याचाही विचार व्हायला हवा. या दृष्टीने महिलांना सक्षम आणि सबल करण्याचे काम करत आहे.' - प्रा. संध्या चौगुले, संस्थापक, हिरवाई संस्था

ठळक मुद्दे१० हजार महिलांचे आर्थिक सक्षमीकरण

दीपक शिंदे ।सातारा जिल्ह्यातील ८३ गावांमधील सुमारे १० हजारांहून अधिक महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणाऱ्या प्रा. संध्या चौगुले यांचा नुकताच दिल्ली येथे 'मेक इन इंडिया' या पुरस्काराने गौरव करण्यात आला. महिलांना केवळ आर्थिक नाही तर मानसिक भक्कम करण्याचे काम त्या गेली २० वर्षे करत आहेत. पहिल्यांदा स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन नंतर बचत गटांच्या माध्यमातून छोटे छोटे व्यवसाय सुरू केलेल्या या महिलांची उत्पादने सध्या जागतिक बाजारपेठेत पोहचली आहेत. नेमके काय आहे त्यांचे काम याबाबत त्यांच्याशी केलेली बातचीत...

  • प्रश्न : आरोग्यदायी व आर्थिक संपन्न भारत ही संकल्पना काय आहे.

उत्तर : आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या लोकांना स्वत:च्या पायावर उभे करून त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने ज्यांनी काम केले. त्यांना मेक इन इंडिया हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांनी राबविलेले उपक्रम देशभरात राबविता येतील का याबाबत विचारमंथन या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये केशव मुरारी दास यांनी अध्यात्म, डॉ. अंकित सिंह यांनी मनुष्यबळविकास, डॉ. तनीषा दत्ता यांनी प्रशासन, इलमा अफरोज, नीलम प्रताप रुडी यांनी व्यवसाय, बिंदू भूषण दुबे यांनी प्रेरणात्मक काम याबाबत आपले विचार मांडले. तर मी ग्रामस्वच्छता अभियान आणि त्यातून उभा राहणारा समर्थ भारत या विषयावर विचार मांडले.

  • प्रश्न : आपल्या या क्षेत्रातील कामाबाबत काय सांगाल..?

उत्तर : गेली २० वर्षे ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे. महिलांमध्ये पहिल्यांदा आत्मविश्वास निर्माण करायचा. त्यानंतर त्यांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक मार्ग उपलब्ध करून द्यायचा. त्यांना छोटे-छोटे उद्योग सुरू करण्यासाठी नियोजन करून द्यायचे आणि तो उद्योग व्यवस्थित चालविण्यासाठी एकमेकांची मदत द्यायची. त्यांनी केवळ पैसे मिळविणे हा उद्देश नव्हता तर आर्थिक सक्षमतेबरोबरच सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न केला.

  • प्रश्न : भारत आर्थिक आणि सामाजिक सक्षम होण्यासाठी काय आवश्यक आहे असे वाटते ?

उत्तर : भारतातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या खेड्यात राहते. तेथील बेरोजगार तरुण, गुन्हेगारीकडे वळताना दिसतात. भारताच्या आर्थिक संपन्नतेचे लक्ष्य साधताना या लोकसंख्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ग्रामीण भागातील युवकवर्गाला, महिलांना आत्मविश्वास देऊन लघुउद्योग करण्यासाठी प्रवृत्त करायला हवे. महिलांना नेतृत्वाची संधी मिळते. मात्र, कर्तृत्व असूनही अधिकार दिले जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. यातून देशाची जवळजवळ अर्धी ऊर्जा सुप्तावस्थेत राहते. देशाला आर्थिक सुबत्ता प्राप्त होण्यासाठी स्त्री सक्षम असणेही महत्वाचे आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdocterडॉक्टर