परळी : उरमोडी प्रकल्पग्रस्त वेणेखोल ग्रामस्थांचा शासनदरबारी तब्बल २१ वर्षांपासूनचा रखडलेला पुनर्वसनाचा व गावठाणाचा प्रश्न आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांमुळे अखेर मार्गी लागला. हा प्रश्न सोडविल्याबद्दल त्यांचा वेणेखोल ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.
उरमोडी प्रकल्पग्रस्त वेणेखोलच्या पुनर्वसनअंतर्गत जमीन मागणी करणाऱ्या खातेदारांचा प्रश्न तब्बल २१ वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित होता. आ. शिवेंद्रसिंहराजे आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली पुनर्वसनासाठी दिलेल्या लढ्यास यश आले असून, म्हसवड येथील गावठाणामध्ये ६८ खातेदारांना कब्जेपट्टी मिळाली आहे. यामुळे वेणेखोल येथील जागा मिळाली आहे. यामुळे वेणेखोल येथील खातेदारांचा महत्त्वाचा प्रश्न सुटला आहे. याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन वेणेखोल गावचे सरपंच नारायण सकपाळ, शिवराम सकपाळ, बाळकृष्ण सकपाळ, परशुराम सकपाळ, बजरंग सकपाळ, अमोल सपकाळ, बाळासाहेब सकपाळ व प्रकल्पग्रस्तांनी त्यांचा सत्कार केला.