शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणावरील गुंतवणूक सर्वोत्तम गुंतवणूक

By admin | Updated: December 29, 2014 23:37 IST

भारत खराटे : शिबिराला विद्यार्थी-पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा : ‘अनेक पालकांची तळमळ असते. जे मला करता आले नाही, ते आपल्या मुलाला देण्याचा प्रयत्न करत असतात. कारण तुमच्या असण्यामध्ये ते स्वत:ला पाहत असतात. शिक्षणावर केलेली गुंतवणूक ही सर्वोत्तम गुंतवणूक असते, हे पालकांनीही लक्षात घेतले पाहिजे,’ असे मत चाटे शिक्षण समूहाचे विभागीय संचालक प्रा. भारत खराटे यांनी येथे व्यक्त केले.‘लोकमत बाल विकास मंच’ व चाटे शिक्षण समूहातर्फे ‘विद्यार्थी व पालकांसाठी विशेष शैक्षणिक मार्गदर्शन ’ आयोजित केलेल्या शिबिरात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन लोकमतचे संस्थापक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने प्रा. भारत खराटे यांनी केले. यावेळी राजेश पवार, एस. जे. पाटील, राजेंद्र घुले उपस्थित होते.दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दहावी बोर्ड परीक्षेची अंतिम टप्प्यातील तयारी व भविष्यातील स्पर्धा परीक्षा आणि संधी’ आणि सातवी, आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल उद्यासाठी या विषयावर विशेष शैक्षणिक मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. दोन सत्रात झालेल्या या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी व पालकांनी हॉल पुर्ण भरून गेला होता.प्रा. प्रा. भारत खराटे म्हणाले, ‘आपण आपल्या पाल्याला योग्यवेळी योग्य ठिकाणी सहकार्य करणे गरजेचे असते. पालकांनी लक्षात घेतले पाहिजे. या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांचा एका बाजूला करिअर डिसाईड होत असतं आणि दुसऱ्या बाजूला आपले पाल्य प्रीएज होत असते. म्हणून या टप्प्यामध्ये मुलांकडे लक्ष दिले गेले पाहिजे. पालकत्व म्हणजे केवळ संगोपन नाही; तर पालकांची प्रेरणादायी जबाबदारी असते. आपल्या पाल्याच्या सहवासात त्याला प्रेरित करणे, चांगले-वाईट वेळीच सांगणे, हे तितकेच महत्त्वाचे आहे. तुमच्या उज्ज्वल भवितव्याचे शिल्पकार तुम्हीच आहात, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. दहावीच्या परिक्षेतील अंतिम टप्प्यात तयारी करताना हाती असलेले दोन महिने कौशल्यपूर्वक वापरले पाहिजेत. मुलांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या आरोग्याकडेही पालकांंनी लक्ष द्यावे, असे चाटे शिक्षण समूहाच्या विभागीय मुख्य कार्यकारी अघिकारी एस. जे. पाटील यांनी सांगितले.चाटे समूहाबद्दल बोलताना खराटे म्हणाले, या समूहातर्फे ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स, हायस्कूल, प्ले ग्रुप व नर्सरी या शैक्षणिक सुविधांबरोबरच मेडिकल, जेइई मुख्य आणि आयआयटी- जेइई आदि परिक्षांची तयारी ही करून घेतली जाते.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पालक व विद्यार्थ्यांनी या शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद दिला. दोन्ही सत्रात कार्यालय विद्यार्थ्यांनी खचाखच भरले होेते. खराटे सरांनी केलेले लाख मोलाचे मार्गदर्शन अंमलात आणायचे, हे मनोमन ठरवूनच पालक व विद्यार्थी सभागृहाबाहेर पडले. राजेंद्र घुले सर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)