शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

‘प्लॅँचेट’च्या नादात तपास खोळंबला

By admin | Updated: August 12, 2014 23:15 IST

हौतात्म्याला एक वर्ष...

सचिन काकडे - सातारा-- डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी शेवटपर्यंत अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला. त्यांच्या या लढ्याने अंधश्रद्धेची जळमटं काढून टाकण्याचे मोठे काम झाले. यामुळे लोकांची मानसिकताच बदलून गेली. मात्र, पुरोगामी महाराष्ट्रात दाभोलकरांच्या खुनाचा तपास करण्यासाठी पोलीस प्रशासनाने ‘प्लॅँचेट’सारख्या प्रकराचा आधार घ्यावा, ही बाबच मुळात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी आणि लांछनास्पद अशीच आहे, अशी प्रतिक्रिया साताऱ्यातील शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला २० आॅगस्ट रोजी एक वर्ष होत आहे, तरीही पोलिसांना खुन्यांचा अद्याप कसलाच सुगावा लागला नाही. सर्व बाजूंनी तपास केल्यांनतरही खुन्यांचा सुगावा लागत नसल्याने पोलिसांकडून अंधश्रद्धेला खतपाणी खालणाऱ्या ‘प्लॅँचेट’सारख्या प्रकाराचा वापर झाल्यानंतर या कृत्याला सर्व स्तरातून विरोध दर्शविण्यात आला. याबाबत साताऱ्यातील शिक्षकांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून त्यांनी ‘प्लॅँचेट’सारख्या प्रकाराबात नागरिकांत जागृती करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.