कऱ्हाड जनता बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीचा पोलिसांनी तपास करावा, त्याचा गुन्हा दाखल करावा, असे न्यायालयाने आदेश दिले आहेत. पोलिसांना ते आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी पत्रकारांना दिली. कऱ्हाड जनता बॅंकेचे कर्मचारी राजेंद्र देसाई यांनी न्यायलायत फिर्यादी दिली आहे. न्यायालयात दाखल झालेल्या फिर्यादित तत्कालीन संचालक मंडळासह बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून ४ कोटी ६२ लाख ८७ हजारांची रक्कम कर्मचाऱ्यांवर दबाव आणून उचलली आहे, असा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. कर्मचाऱ्यांना दिलेल्या कर्जाची रक्कम वाठारकर यांनी त्यांच्या निकटच्या मित्रांच्या कर्जाच्या खात्यात भरली आहे, असाही आक्षेप आहे. त्या खात्यात ती रक्कम वर्ग करून ती खाती बंद केली आहेत. त्या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशीही कर्मचाऱ्यांची मागणी आहे. त्या फिर्यादीनुसार पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून त्या सगळ्याचा तपास करावा, असे आदेश न्यायलयाने दिले आहेत.
कर्मचाऱ्यांच्या नावावरील कर्ज प्रकरणांचा तपास करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:07 IST