खंडाळा : खंडाळा तालुका कुस्तीगीर संघाचे सचिव व असवली गावचे सुपुत्र नवनाथ ढमाळ यांची आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच म्हणून निवड झाली आहे. जागतिक कुस्ती संघटनेच्या (फिला) वतीने ही निवड जाहीर करण्यात आली.जॉर्डन देशातील आमना सिटी येथे जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने नुकतीच आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच निवड परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये भारतीय कुस्ती संघाच्या वतीने खंडाळ्यातील नवनाथ ढमाळ यांनी सहभाग घेतला होता. या पंच परीक्षेत उज्ज्वल यश मिळवून त्यांची आंतरराष्ट्रीय पंच म्हणून निवड झाली आहे.या यशाबद्दल राज्य कुस्तीगीर संघाचे बाळासाहेब लांडगे, नामदेवराव मोहिते, सर्जेराव शिंदे, विलास कथूर, संदीप भोंडवे, किसन बुचडे, मोहन खोपडे, दिनेश गुंड यांच्यासह तालुक्यातील विविध पदाधिकारी, अधिकारी व मान्यवरांनी नवनाथ ढमाळ यांचे कौतुक केले आहे. (प्रतिनिधी)
आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच पदी नवनाथ ढमाळ यांची निवड
By admin | Updated: December 2, 2014 00:27 IST