शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

माणदेशी चारा छावणी बंदचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:28 IST

म्हसवड : येथील माणदेशी फाउंडेशनमार्फत सुरू असलेली चारा छावणी आर्थिक आणीबाणी व पाणी उपलब्ध होत नसल्याने छावणीचालकांनी बंद करण्याचा ...

म्हसवड : येथील माणदेशी फाउंडेशनमार्फत सुरू असलेली चारा छावणी आर्थिक आणीबाणी व पाणी उपलब्ध होत नसल्याने छावणीचालकांनी बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे माणदेशी फाउंडेशनचे संचालक विजय सिन्हा यांनी सांगितले. दरम्यान, छावणी बंद होऊ नये. या खासगी छावणीचे शासकीय अनुदानित छावणीत रूपांतर होण्यासाठी, तसेच उरमोडीचे पाणी म्हसवड परिसरातील माणगंगेत येण्यासाठी आमदार जयकुमार गोरे, विजय सिन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेणार असल्याचे सांगितले.माणदेशी फाउंडेशन संचलित जनावरांच्या चारा छावणीत जनावरांसोबत मुक्कामी असलेल्या ६४ गावांतील सुमारे चार हजार शेतकरी कुटुंबांची शनिवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत सिन्हा बोलत होते. यावेळी माणदेशी फाउंडेशनचे उपाध्यक्ष जवाहर देशमाने, करण सिन्हा, रवी वीरकर, आदी प्रमुख उपस्थित होते. सिन्हा म्हणाले, ‘सध्या चारा छावणीत साडेनऊ हजार जनावरांना रोज सहा लाख लिटर पाण्याची गरज असून, म्हसवड भागात शोधूनही पुरेसे पाणीच उपलब्ध होऊ न शकल्यामुळे येथील माणदेशी फाउंडेशन संचलित जनावरांची चारा छावणी बंद करण्याचा दु:खद असा निर्णय घ्यावा लागत आहे.माण तालुक्यात दुष्काळाच्या संकटामुळे जनावरांना चारा आणि पाणी मिळत नसल्याने दुभती जनावरे मिळेल त्या किमतीत शेतकरी विकत आहेत. माणमधील शेतकऱ्यांना संकटातून वाचविण्यासाठी शासनाच्या निर्णयाची वाट न पाहता माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून एक जानेवारीपासून जनावरांची छावणी सुरू करण्यात आली. त्यासाठी मुंबई येथील बृहत भारतीय समाज व बजाज कंपनीने आर्थिक मदतीचा हात पुढे केला. आज सुमारे साडेनऊ हजार जनावरे व त्यासोबत चार हजार कुटुंबे या छावणीत साडेतीन महिने मुक्कामी राहिली आहेत.कागदोपत्री पूर्तता किचकटसध्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालल्यामुळे विहिरी आटल्याने पाणीच उपलब्ध नसल्यामुळे जनावरांचे हाल होत आहेत. शासकीय अनुदानातून छावणी सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली कागदोपत्री पूर्तता किचकट असल्याने सोमवारी मुंबई येथे भेट घेण्यात येणार असल्याचे सिन्हांनी सांगितले.