शहरं
Join us  
Trending Stories
1
BIhar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
5
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
6
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
7
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये मीठ का घालतंय? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
8
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
9
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लग्जरी इलेक्ट्रिक कार देती ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
10
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
11
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
12
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
13
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
14
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
15
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
16
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
17
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
18
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
19
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
20
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!

इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

By admin | Updated: June 14, 2016 00:23 IST

पेठवडगाव नगरपालिका : आरक्षण, प्रभाग रचनेकडे लक्ष

सुहास जाधव-- पेठवडगाव नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे़ या निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर यंत्रणा सक्रिय झाली आहे़ मात्र, इच्छुकांनी राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे़ तर इच्छुकांचे नगराध्यक्ष, संभाव्य प्रभाग रचना अनुकूल पडावी, यासाठी इच्छुकांकडून ‘देव’ पाण्यात घातले जात आहेत़ नगराध्यक्षपदासाठी पूर्वीचेच आरक्षण असणार की, नव्याने आरक्षण जाहीर होणार, तसेच प्रभाग रचना, आरक्षण जून महिन्यातच जाहीर होणार की लांबणीवर पडणार, याबाबत सध्या संभ्रमावस्था आहे़ १९९७ पासून पालिका नगराध्यक्षपदाचे आरक्षण सुरू झाले़ यावर्षी महिला प्रवर्गासाठी तर इतर मागासवर्गासाठी प्रत्येकी अडीच वर्षे नगराध्यक्षपद आरक्षित झाले़ तर २०११ला थेट जनतेतून सर्वसाधारण गटातून नगराध्यक्षपदाची आरक्षणानुसार निवडणूक झाली़ हे आरक्षण पाच वर्षांसाठी होते़ २००६ ला इतर मागासवर्गीयांसाठी, तर खुल्या गटासाठी प्रत्येकी अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण होते़ तर २०११ला अनुसूचित जातीसाठी, तर खुल्या गटातील महिला वर्गासाठी आरक्षित होते़ या पार्श्वभूमीवर अनुसूचित महिला प्रवर्गासाठी आरक्षण अद्यापही झालेले नाही़पालिका निवडणुकीसाठी २०११ च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना होणार आहे़ या निवडणुकीसाठी आठ प्रभाग होणार आहेत. यानुसार प्रभाग रचना करण्याचे अधिकार मुख्याधिकाऱ्यांना आहेत़ मुख्याधिकाऱ्यांनी प्रारूप प्रभाग रचना तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्याचे समजते़ या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर निवडणुकीसाठी यंत्रणा सक्रिय झालेली आहे़ इच्छुकांचे लक्ष थेट नगराध्यक्ष, प्रभाग रचना, प्रभाग आरक्षण याकडे आहे़ अनेकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवायची यासाठी मशागत केली आहे़ अनुकूल आरक्षण पडावे, यासाठी इच्छुकांनी ‘देव’ पाण्यात घातले आहेत़ त्याचबरोबर युवा पिढीही पालिका निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्नशील आहे़ यादव, सालपे नंतर कोण ?१९७४ ला थेट निवडणुकीत यादव गटाचे नेते विजयसिंह यादव, तर युवक क्रांती आघाडीचे नेते शिवाजी सालपे यांना २००१ मध्ये नागरिकांनी संधी दिली होती़ आता दोघेही हयात नाहीत़ त्यामुळे या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदाचे आरक्षण कोणते पडणार? तर थेट नगराध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचेच लक्ष आहे़