शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांच्या जिव्हाळ्याचे प्रकल्प प्रगतिपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:19 IST

सचिन काकडे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारकरांच्या जिव्हाळ्याचे तीन प्रकल्प प्रगतिपथावर असून, या प्रकल्पांपैकी एक असलेल्या कास ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारकरांच्या जिव्हाळ्याचे तीन प्रकल्प प्रगतिपथावर असून, या प्रकल्पांपैकी एक असलेल्या कास धरणाचे काम जवळपास ७५ टक्के तर ग्रेड सेपरेटरेचे काम ७० टक्के पूर्णत्वास आले आहे. केवळ पालिकेची भुयारी गटार योजना संथ गतीने सुरू असून, हे काम गतिमान करणे गरजेचे बनले आहे.आठ रस्ते एकत्र जोडणाऱ्या पोवई नाका परिसरातून दररोज सुमारे २ लाख ७१ हजार ४५० वाहने ये-जा करतात. शहरातील सर्वाधिक वाहतुकीचा ताण याच ठिकाणी पाहावयास मिळतो. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटर (भुयारी मार्ग) उभारण्याचे काम बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे.याचबरोबरच वाढती लोकसंख्या व शहरीकरणाचा विचार करता नगरपालिकेच्या वतीने कास धरणाची उंची वाढविण्याचे कामही हाती घेण्यात आले. १ मार्च २०१८ पासून धरणाची उंची वाढविण्याचे काम जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत धरणाचे एकूण काम ७५ टक्के तर मातीकाम जवळपास ९५ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरीत कामेही प्रगतीपथावर आहते.ग्रेड सेपरेटर व कास धरणाच्या उंचीसह शहरात यावर्षी भुयारी गटार योजनेचे कामही सातारा नगर पालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या योजनेचे गेल्या चार ते पाच महिन्यांमध्ये केवळ १५ टक्के काम पूर्णत्वास आले आहे. पावसाळ्यात कास धरण व भुयारी गटार योजनेचे काम पूर्णपणे बंद राहणारआहे. पावसाळा संपल्यानंतर ही कामे पुन्हा हाती घेतली जाणार आहेत. ग्रेड सेपरेटरचे काम मात्र पावसाळ्यातही सुरू राहणार आहे. डिसेंबर २०१९पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा मनोदय आहे.७५ कोटींची योजनापुणे-मुंबईच्या धरतीवर ग्रेड सेपरेटरची बांधणी होत असून, जिल्ह्यातील ही पहिलीच योजना आहे. सुमारे ६० कोटी रुपयांचे हे काम होते. मात्र, त्यानंतर गोडोलीकडे जाणाºया मार्गाचे अधिक काम करण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त १५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण ग्रेड सेपरेटरचे काम हे ७५ कोटींवर गेले आहे. चौदा महिन्यांत ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.पहिल्या टप्प्यात५० कोटींची तरतूदशहरातील चिमणपुरा पेठ, व्यंकटपुरा पेठ, करंजे, बुधवार नाका परिसर, बोकील बोळ आदी ठिकाणी भुयारी गटारचे काम करण्यात आले आहे. शहरात एकूण ३२ किलोमीटर क्षेत्रात भुयारी गटारचे काम केले जाणार आहे. आतापर्यंत दोन किलोमीटर क्षेत्रातील काम पूर्ण झाले आहे. शासनाकडून या योजनेच्या पूर्णत्वासाठी पहिल्या टप्प्यात ५० कोटी ३० लाखांचा निधी मंजूर केला आहे.