सातारा : इनरव्हील क्लब ऑफ साताराचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. नूतन अध्यक्ष संगीता लोया यांना गतवर्षीच्या अध्यक्ष प्रज्ञा माने यांनी पदभार सुपूर्द केला.
नूतन सचिव स्नेहा भट्टड आणि नूतन खजिनदार म्हणून वैद्य मृणालिनी जोशी यांनी पदभार स्वीकारला. २०२१-२०२२ वर्ष हे स्त्री सबलीकरण थीमवर आधारित असून, स्त्रियांचे शारीरिक-मानसिक आरोग्य, अर्थसाक्षरता, पर्यावरणपूरक उपक्रम, कोरोनाबद्दल जागृती, प्लॅस्टिकमुक्ती, ऑक्सिजन वृद्धीसाठी वृक्षारोपण, असे अनेक उपक्रम राबविणार असल्याचे अध्यक्ष संगीता लोया यांनी जाहीर केले.
यावेळी लीना कदम, वैशाली पाटील, संगीता झंवर, सीमा मुथा, स्मिता वखारीया, डॉ. निलोफर बागवान, श्रुती कुलकर्णी आदी उपस्थित होते. गीता मामणिया यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. सूत्रसंचालन चित्रा भिसे यांनी केले.