शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-देवघरप्रश्नी मंत्रालयात स्वतंत्र बैठक

By admin | Updated: July 17, 2017 14:51 IST

गिरिश महाजन यांचे आश्वासन; पुरुषोत्तम जाधव यांचे निवेदन

आॅनलाईन लोकमतखंडाळा (जि. सातारा), दि. १६ : नीरा-देवघर प्रकल्पाच्या कालव्याची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करुन खंडाळा तालुक्यात पाणी प्रवाहित करावे यासाठी भाजपाचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन चर्चा केली. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी मंत्रालयात जलसंपदा विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी मंत्री महाजन यांनी दिले.नीरा-देवधर उजव्या कालव्यातील ४० ते ६५ किलोमीटर अंतरातील कामे सध्या पूर्ण झालेली आहेत. परंतु खंडाळा तालुका हद्दीतील ६५ ते ७८ किलोमीटर अंतरातील काम अपूर्ण आहे. लाभक्षेत्रातील वाघोशी (२८१ हेक्टर), अंदोरी (९०६ हेक्टर), मरिआईचीवाडी (४३० हेक्टर), बावकळवाडी (४६८ हेक्टर), पाडेगाव (१४० हेक्टर), बाळुपाटलाचीवाडी (२२४ हेक्टर), लोणंद (२ हजार ६६ हेक्टर) असे एकूण ४ हजार १५ हेक्टर लाभक्षेत्रास शेतीपाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. या कालव्याची कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत या मागणीसाठी मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेऊन प्रकल्पाची कामे मार्गी लागण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठानतर्फे पुरुषोत्तम जाधव यांनी केली. या विषयावर मंत्रालयात बैठक आयोजित करण्याच्या सूचना मंत्री महाजन यांनी जलसंपदा विभागाला दिल्या असल्याची माहिती देण्यात आली. 

तरीही कामे ठप्प का?

नीरा देवघरच्या पाण्यासाठी एकीकडे विरोधी पक्षाच्या वतीने आवाज उठविला जात आहे तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचेही प्रयत्न सुरु आहेत. मग कालव्याची कामे ठप्प का? असा प्रश्न लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसह नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.